सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी - डॉ भारती पवार

नाशिक: त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Shruti Patil
  • Jan 16 2024 11:55AM

नाशिक: त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्याच्या, आयुष्यमान भारत, आवास योजनेची घरे, जलजीवन मिशन, उज्वला गॅस अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना ह्या गावागावात पोहचत आहे की नाही? हे पडताळून पाहणे व देशाला विकसित भारताकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच या यात्रेचा उद्देश असून या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचे काम करत असून ही संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान देवडोंगरा ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या या दरम्यान केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी यावेळी सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना त्वरित सोडवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान महिलांना आयुष्यमान भारत कार्ड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅलेंडरचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सुनील बच्छाव, सुनील जाधव, जयराम भाऊ भुसारे,सुमित्रा वड ,सुनंदाताई टोपले, विजय महाले, पवन गावित, रघुनाथ घाटाळ, विशाल चौधरी , दिलीप डोकंफोडे, राहुल पवार, हिरामण घाटाळ, नवनाथ बदादे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार