सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीराम मंदिराच्या शीलान्यासानिमित्त नंदनगरीतही दुमदुमला जय श्रीरामचा जयघोष*

अयोध्येत आज झालेल्या राममंदिराच्या भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे हिंदू रक्षकांकडून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र यांची विधिवत पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली. केवळ देशातील नव्हे ,तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत होते. त्या राम मंदिराची स्वप्नाची पूर्ती बुधवारी झाली. या अनुषंगाने श्री राम भक्त हिंदू रक्षकाकडून नंदुरबार येथे आनंदस्तोव साजरा करून पूजा महाआरती करण्यात आली. सुरक्षा समितीचे प्रमुख तथा भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Sudarshan MH
  • Aug 5 2020 7:00PM
*नंदुरबार: लॉकडाऊनचे नियम पाळत मंदिर शिलान्यासाचा आनंदोत्सव साजरा
नंदुरबार ( वृत्तसेवा)- आयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा शिलान्यास होत असतांना ईकडे नंदुरबार जिल्ह्यातही घरोघरी  पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लॉकडाउनचे नियम पाळत मंदिरांवर, घरांवर भगवा फडकावत, विविध ठिकाणी सामुहिक प्रतिमापुजन करीत आणि कारसेवकांचे सत्कार करीत राम नामाचा जयघोष करण्यात आला.
यानिमित्त कोणत्याही कारणाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नंदुरबार तळोदा शहादा येथील काही मंदिरांबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. खासदार डॉक्टर हिना गावित, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख विजय चौधरी, शिवसेनेचे येथील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे आमदार डॉक्टर राजेश पाडवी , प्रदेश समिती सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी आधी प्रमुख नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सर्व जनतेला शीलान्यासानिमित्त शुभेच्छा दिल्या. भाजपा जिल्हाप्रमुख विजय चौधरी यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथील कार सेवकांचा सत्कार संपन्न झाला. वाहतूक मोर्चा प्रमुख जितेंद्र राजपूत यांनी आयोजित केलेला प्रतिमा पूजन सोहळा विजय चौधरी यांच्या हस्ते पार पडला. तळोदा शहादा नवापूर येथेही कार सेवकांचा सत्कार आणि राम मंदिरातील आरती संपन्न झाली. भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे सर्व मंदिरांवरचे ध्वज बदलवून नवीन भगवे ध्वज लावण्यात आले. जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, जिल्हा सेवा प्रमुख धनंजय बारगळ, जिल्हा मठ मंदिर प्रमुख आर.आर.मगरे,  प्रखंड कार्याध्यक्ष डॉ.शांतीलाल पिंपरे, प्रखंड मंत्री दीपक चौधरी, शहर अध्यक्ष मुकेश जैन, शहर उपध्यक्ष भूपेंद्र बारी, शहर मंत्री पवन शेलकर, बजरंग दल संयोजक अजय परदेशी आदींचा यात सहभाग होता. गोरक्षा समिती प्रमुख तथा भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात आरती करून कारसेवकांच्या सत्काराचा छोटेखानी कार्क्रमही संपन्न झाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार