सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोफत कोरोना चाचणी शिबिरात ३४ जणांचे स्वॅब संकलित

अग्रवाल समाज व आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार

Nandurbbar MH
  • Sep 12 2020 11:41AM
सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) : नंदुरबार-येथील रोटरी क्लब नंदुरबार, अग्रवाल समाज व आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोफत कोविड-१९ तपासणी शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात एकुण ३४ जणांनी स्वॅब तपासणी करुन घेतली. 
रोटरी क्लब नंदुरबार नेहमीच सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करत असते. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यासंबंधीची समाजातील भिती नाहीशी व्हावी व सामाजिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी दि ११ सप्टेंबर २०२० शुक्रवार रोजी येथील अग्रवाल भवनात सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान मोफत कोविड-१९ तपासणी शिबिर घेण्यात आले. यात एकूण ३४ व्यक्तींनी स्वँब तपासणी करून घेतली. संबंधितांचा रिपोर्ट दोन दिवसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्याप्रमाणे कोरोनटाइन संदर्भात त्यांना आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात येतील. या शिबिरासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ४ आरोग्य कर्मचार्‍यांची टीम कार्यरत होती. त्यात डॉ.उमेश गिरासे, शिवहरी ठाकरे, नाना बोरसे, हिना सिस्टर यांनी स्वॅब तपासणी केली. या शिबिराप्रसंगी रोटरी अध्यक्ष पंकज पाठक, सेक्रेटरी नीरज देशपांडे, हिरालाल महाजन, डॉ.विनय जैन, डॉ.निर्मल गुजराती, नरेंद्र जाधव, हितेशभाई सुगंधी, दीपक शहा, अनिल अग्रवाल, मधुकर माळी, सौ.जयंती देशपांडे, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष मनोज  अग्रवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्टर चेअरमन मधुकर माळी, अनिल अग्रवाल, दीपक शाह, हिरालाल महाजन आदींनी परिश्रम घेतले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार