सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रांज्य व देशात नावलौकीक असलेली नंदुरबार जिल्हयातील " ग्रामपंचायत बोकळझर भ्रष्टाचाराच्या विळोख्यात "

विकासात्मक व गावाच्या एक जुटीच्या माध्यमातून एकेकाळी अनेक पुरस्कार मिळवून राज्यात नाही तर देशात नाव असलेली नंदुरबार जिल्हयातील

Nandurbar MH
  • Jun 17 2021 10:29AM


विकासात्मक व गावाच्या एक जुटीच्या माध्यमातून एकेकाळी अनेक पुरस्कार मिळवून राज्यात नाही तर देशात नाव असलेली नंदुरबार जिल्हयातील " ग्रामपंचायत बोकळझर भ्रष्टाचाराच्या विळोख्यात " सदया सापडलेली आहे . यापूर्वीच्या सरपंचानी विकास कामांसाठी अनेक निधी आणला त्यानिधींचे योग्यनियोजन करून लोकहिताच्या योजना गावात राबविल्या . विकासात्मक दृष्टीकोन ठेवून गावासाठी विविध कामे केली . गावातील सिमेंट रस्ते , दिवाबत्ती , सांडपाण्याची व्यवस्था , नळ योजना , शंभर टक्के घरकुल योजना , गावस्वच्छता मोहिमेअंतर्गत गाडगेबाबा स्वछता मोहीम राबविली , महात्मागांधी तंटामुक्तगाव , सर्वगावक - यांच्या सहकार्याने गावामध्ये अनेक योजना यशस्वीरित्या राबवून गावातील प्रत्येक कुटूंब सक्षम करण्याचे प्रामाणिकपणे प्रयल करून गावाचे नाव राज्यभरात नावारूपाला आणले . गावामध्ये एकही उर्किडा दिसत नव्हता . गावातील सर्व उर्किडे गावाचे बाहेर व्यवस्था केलेली - गावस्वच्छ व सुफलाम बनविण्याचे व्हिजन डोळयासमोर ठेवून गावाचा विकास केला . शंभर टक्के कुटूंव शौचालय मुक्त झाल्दी " माझे कूटूंब माझे शौचालय " हि योजना यशस्वीपणे संपूर्ण गावात राबवू बोकळझर गाव हगणदारी मुक्त केले . गावात पक्की गटारे बांधली . पहिली जूनी पाण्याची टाकी २५,000 हजार लिटर क्षमतेची होती . त्यामार्फत गावाला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत होतो . त्यामुळे नवीन २0,000 हजार लिटर क्षमतेची स्वतंत्र पाणीची टाकी बांधली प्रत्येक कूटूंबाच्या दारात चौवीस तास पाण्याची व्यवस्था करण्यात आली . गावामध्ये सौरऊर्जेचे दिवाबत्तीची सोय केली . त्याचप्रमाणे " एक कुटूंब एक झाड " प्रत्येक कुटूंबाच्या दारात झाड लावण्यात आले आहेत . मागील सरपंचानी जणू गावविकासाचा विठाच उचलेला . मात्र सन -२०१७ ते २०२१ या पंचवर्षात एकही गटार आजपर्यंत साफसाफई व उपसण्यात आलेले नाहीत . विविध प्रकाराचा ग्रामपंचायतला निधी मिळालेला आहे.तो निधी काठे व कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला हे गावातील सामान्य गावका - यांना माहितीच नाही . यापंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायतस्तर सदस्यांच्या मासिक सभा , गावातील लोक हिताच्या दृष्टीने , गावविकासाच्या दृष्टीने ग्रामसभा झाल्याच नाही . या पाच वर्षात गावामध्ये कोणत्या योजना आणल्या हेच गावक - यांना माहित नाही .कोणतेही विकासात्मक कामे गावात झालेली नाही . गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमधली शैक्षणिक गुणवत्तेकडे कोणतेच लक्ष नाही . समाजातील मुलांचे गावस्तरावर खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे . बोकळझर गाव रंगावली नदीच्या काठावर वसलेले असून दरवर्षी पुराचा तडाखा गावाला बसत आहे .यासाठी कोणतीच उपाययोजना नाही . कोणतेचे नियोजन , आराखडा व तरतुद करण्यात आलेली नाही . नदी काठावर अर्धीच सरंक्षण भिंत केलेली आहे . आज ज्यांच्या कुटूंबांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालेले आहे . त्यांना कोणतीच मदत मिळालेली नाही पंचनामे होऊन सूध्दा आजही नदी काठचे काही कुटूंब मदतीच्या प्रतिक्षेत आहेत . म्हणून आम्ही अनेक योजनांचे माहितीच्या अधिकारीच्या आधार घेऊन माहिती मागविली . मात्र " बोकळझर ग्रामपंचाय भ्रष्टाचाराच्या विळोख्यात " निश्चित आहे आज पर्यत बोकळझर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही . त्यामुळे नाईलाजाने आम्ही पुढेचे अपील करत आहे . पुढिल प्रकारणामधील चौकशीत जे - जे दोषी आढळतील त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस दाखल करून कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल गावीत व श्री.दिपक गावीत यांनी केली आहे .

(नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे)

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार