सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदनगरीचे सर्व भाविकांचे श्रध्दास्थान असलेले खोडाई देवी मंदिर बरोबर मंदिर परिसरातील १०० मीटरपर्यन्त बॅरिकेटिंग केले असल्याने भाविक मुखदर्शना पासूनही वंचित

नंदुरबार:- ऐन नवरात्री उत्सव काळात मंदिर बंद असल्याने

Nandurbar MH
  • Oct 19 2020 6:42PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार:- ऐन नवरात्री उत्सव काळात मंदिर बंद असल्याने  भाविकांचा श्रेध्येवर घाला घातला गेला आहे त्यातच भर म्हणून की काय नंदनगरीचे सर्व भाविकांचे श्रध्दास्थान असलेले खोडाई देवी मंदिर बरोबर मंदिर परिसरातील १०० मीटरपर्यन्त बॅरिकेटिंग केले असल्याने भाविक मुखदर्शना पासूनही वंचित राहात आहे भाविकांचा भावनांचा विचार करता मंदिराचे बॅरिकेटिंग सोडून १०० मीटर परिसरातील  बॅरिकेटिंग काढून टाकावी व भाविकांना मुखदर्शन घेऊ द्यावे या आशयाचे निवेदन विविध हिंदुत्ववादी संघटना आणि भाविक यांचा वतीने सहायक जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांना देण्यात आले    
 निवेदनात म्हटले आहे की,यावर्षी कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून धार्मिक व प्रार्थनास्थळे शासकीय आदेशानुसार बंद आहेत. शासन प्रशासन यांचा मान राखून भाविकही आजपर्यंत या बंदोबस्ताला प्रतिसाद देत आले आहेत. तथापि आता जर नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि सर्व अनलाँक होत आहे तर खोडाई देवीचे दर्शन किमान दुरुन तरी घेऊ द्यावेत; ही लोकांची अपेक्षा आहे. परंतु ऐन नवरात्रीच्या पावन पर्वात मंदिराकडे जाणारे रस्तेच बंद करण्यात आले आहेत. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला असून श्रद्धेला आळा घातल्यासारखे झाले आहे.  भाविक रस्त्यावर उभे राहूनच गर्दी न करता दर्शन घेऊ शकत आहेत व कोरोना प्रसाराची कोणतीही शक्यता त्यातून नाहीये तर मंदिराजवळ येण्यापासून भाविकांना का रोखले जाते हा लोकांना पडलेला प्रश्न आहे. प्रशासनाने खोडाई देवी मंदिराच्या १०० मीटर परिसरातच बॅरिकेटिंग केल्याने भाविक मंदिराकडे जाण्यापासून आणि दूर उभे राहून मुख दर्शनापासूनही वंचित झाले आहेत. तरी प्रशासनाने खोडाई देवी मंदिर परिसरातील बॅरिकेटिंग काढून भाविकांना खोडाईदेवीचा मुखदर्शनाचा लाभ घेऊ द्यावा असे निवेदन देण्यात आले निवेदनावर डॉ नरेंद्र पाटील, हिंदुत्वनिष्ठ मयूर चौधरी,
विश्व हिंदु परिषदेचे अजय कासार, शिवप्रतिष्ठानचे नरेंद्र तांबोळी, दिलीप ढाकणे पाटील, स्वराज्य निर्माण सेनेचे दिग्विजय ठाकरे, नरेंद्र चौधरी, स्वदेशी बचाव आंदोलनाचे कपिल चौधरी, श्री दुर्गामाता दौड उत्सव समितीचे धारकरी आणि भाविकांचा स्वाक्षऱ्या आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार