सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भिंतीच्या वादातून नणंदने विट मारुन विवाहितेचे डोके फोडले

विट मारुन विवाहितेचे डोके फोडले

Nandurbar. MH
  • Jun 18 2022 6:07AM


संजय नगरातील घटना


नंदुरबार- घराच्या भिंतीला तडा गेल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या नणंदने विवाहितेला विट मारुन डोके फोडल्याची घटना शहरातील संजय नगरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय नगरातील बुस्टर पंप जवळ राहणाऱ्या अनिता नाना मराठे (३५) यांच्या घराच्या सामाईक भिंतीत शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नणंद मिराबाई प्रल्हाद मराठेस यांनी खिळा ठोकला त्यामुळे भिंतीला तडा गेला याबाबत अनिता मराठे यांनी हिराबाई यांना जाब विचारला असता त्याचा रागातून त्यांनी विट मारुन अनिता मराठे यांचे डोके फोडले.तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदर घटना दि.१५ जुन रोजी दुपारी ४.३० वाजता घडली.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार रतिलाल पावरा करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार