सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार, दि.8 : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्याना शास्त्रोक्त प्रशिक्षण,

Nandurbar MH
  • Feb 9 2022 11:24AM

नंदुरबार, दि.8  : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्याना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास,अद्यावत क्रीडा सुविधा व क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी खेळाडूंनी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.

क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी अर्हता पुढील प्रमाणे आहे. क्रीडा प्रबोधिनीतील सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी खेळाडू हा संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे ( 1जानेवारी 2003 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा ) अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची तज्ञ समितीकडून चाचणी करुन प्रवेश 50 टक्के देण्यात येईल.

 क्रीडा प्रबोधिनीत खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे ( 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा ) अशा खेळाडूना संबंधित खेळाचे कौशल्य चाचणीचे आयेाजन करुन गुणानुक्रमे 50 टक्के प्रवेश देण्यात येईल.

 अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी खेळाडूंची संख्या एका क्रीडा प्रबोधिनीत 25 अशी असेल.
 अमरावती-अर्चरी, ज्युदो, नागपूर हॅण्ड बॉल व ॲथलेटिक्स, अकोला बॉक्सिंग व ॲथलेटिक्स, गडचिरोली ॲथलेटिक्स, ठाणे बॅडमिटन, नाशिक शुटींग, ॲथलेटिक्स, कोल्हापूर शुटींग व कुस्ती, औरगांबाद ॲथलेटिक्स व हॉकी तर पुण्यासाठी टेबल-टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल या खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

 जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे विहीत नमुनातील अर्ज उपलब्ध असून 15 फेब्रुवारी 2022 पर्यत अर्ज सादर करता येईल. चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी विहीत नमुन्यात अर्ज, जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे, क्रीडा प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्म दाखला अर्जासोबत जोडावे. जिल्हास्तरावर संकलित झालेल्या अर्जानुसार 21 ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विभागस्तरीय चाचणीचे आयोजन करण्यात येईल. विभागस्तरीय चाचण्यामधून पात्र खेळाडूंना राज्यस्तरीय चाचण्याचा सविस्तर कार्यक्रम कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी  क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी (7038275767) तसेच मुकेश बारी (8668971377) यांच्याशी संपर्क साधावा,असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार