सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेलूताईच्या सत्काराने महिला विभागाला ऊर्जा - मंत्री यशोमती ठाकूर

नंदुरबार दि.9: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना त्यांचा आहार वेळेवर मिळावा यासाठी रेलूताई वसावे होडीच्या साह्याने कठीण प्रवास करतात.

Nandurbar MH
  • Aug 9 2021 2:51PM


नंदुरबार दि.9: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना त्यांचा आहार वेळेवर मिळावा यासाठी रेलूताई वसावे होडीच्या साह्याने कठीण प्रवास करतात. या नव्या हिरकणीच्या विशेष धाडसाचं आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर रेलूताईंचा सत्कार करून मंत्री महोदयांनी स्वतःच्या जवळच्या खुर्चीवर रेलूताईंना बसवून घेतले. काहीही अडचण आली तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याची सूचनाही केली.

चिमलखेडी परिसरातील पाड्यावर पोषण आहार पोहोचविताना रेलूताईंनी अनेकदा बोटीने  प्रवास केला. डोक्यावर पोषण आहार घेऊन डोंगराळ भागातून पायी प्रवासही केला. तिच्या या असामान्य कर्तृत्वामुळे  सत्कार करताना केवळ तिलाच नव्हे तर संपूर्ण महिला विभागातील हजारो अंगणवाडी ताईंना यानिमित्ताने ऊर्जा मिळाली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी  व्यक्त केली.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार