सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार दि.30: आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील सन 2017-2018

Nandurbar MH
  • Aug 31 2021 6:16PM


नंदुरबार दि.30: आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील सन 2017-2018 या आर्थिक वर्षाकरिता भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275 (1) योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी अनुदान देण्यात येणार असून नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून 9 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

सोलर पंप अर्थसहाय्यासाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा व वार्षिंक उत्पन्न 1 लाख 50 हजाराच्या आत असावे किंवा लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा. लाभर्थ्यांकडे सिंचनाचे साधन असावे. (विहीर, इतर ) विद्युत कंपनीकडून वीज जोडणी झालेली नसावी. लाभार्थ्यांने यापूर्वी मुख्यमंत्री सोलर पंप व प्रधानमंत्री सोलर पंप योजनेचा अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत ना-हरकत प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, सातबारा उतारा, वनहक्क प्रमाणपत्र , आधारकार्ड, बँक खाते क्रमांक इत्यादी जोडणे आवश्यक राहील.

योजनेच्या अधिक माहितीसाठी व  अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार