सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार दि.18 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021

Nandurbar MH
  • Sep 18 2021 4:32PM


 नंदुरबार दि.18 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा  (एमएचटी-सीईटी) 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021  या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
 
नंदुरबार जिल्ह्यासाठी सामायिक परीक्षा ही डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (लोणखेडा परिसर ) या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारी या दोनसत्रात घेण्यात येणार आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 6.30 वाजेपासून ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये.

सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार