सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्याला 60 कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर

नंदुरबार : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत नंदुरबार जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत

Nandurbar. MH
  • Feb 10 2021 7:56PM
नंदुरबार : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत नंदुरबार जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (सर्वसाधारण) 2021-2022 या वर्षासाठी 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. 
 
जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत सन 2021-2022 च्या आराखड्यासाठी 69 कोटी 57 लक्ष रुपयांची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय बैठकीत त्यानुसार नियतव्ययाच्या मर्यादेत आराखडा सादर करण्यात आला होता. विविध विभागांची अधिकची मागणी लक्षात घेऊन 60 कोटी 43 लक्ष रुपयांचा वाढीव म्हणजेच 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 
बैठकीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड के.सी.पाडवी, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, अपर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उपायुक्त नियोजन पी. एन. पोतदार, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी , सहायक नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते.
 
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी राज्यस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. अमरावती मध्यम प्रकल्प ते अमरावतीनाला लघु पाटबंधारे योजना नदीजोड कालव्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ असे श्री.पवार यांनी सांगितले.
 
पालकमंत्री श्री.पाडवी म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश भाग दुर्गम असल्याने शाळा खोली बांधकाम व दुरुस्ती ,रस्ते विकास,अंगणवाडी बांधकाम, अमृत आहार योजना, पशुसंवर्धन, जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये सौरऊर्जेच्या सुविधेसह डिजिटल शाळा करणे, कौशल्य विकास अंतर्गत जिल्ह्यात रोजगार निर्मिती ,आरोग्य सुविधांचे बळकटीकरण,बोट ॲम्बुलन्स व इतर आरोग्यसेवा सुविधासाठी निधीची आवश्यकता असल्याने वाढीव निधी मिळण्याबाबत मागणी केली. जादा निधी मंजूर झाल्यास योग्य नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रगती होण्यासाठी मदत होईल असे पालकमंत्री श्री.पाडवी यांनी सांगितले.
 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत होणाऱ्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीव निधीची माहिती दिली.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार