सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार :रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच होते केवळ तपासणी, इतरत्र मात्र अलबेल

नंदुरबार येथील रेल्वे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच रेल्वे प्रवाशांची तपासणी केली जात आहे

Nandurbar MH
  • Nov 30 2020 6:18PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - येथील रेल्वे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच रेल्वे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. संशयित रुग्णांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान, येत्या काळात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता स्थानकात रॅपिड अँटीजन कोरोना टेस्टची सुविधा करावी अशी मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे. 
नंदुरबार रेल्वे स्थानक हे ताप्ती सेक्शनवरील अर्थात सुरत-भुसावळ रेल्वे स्थानक आहे. येथे सर्वच प्रकारच्या जलद, अतिजलद, विशेष रेल्वे गाड्यांना थांबा आहे. लॉकडॉऊननंतर या स्थानकावर येणाऱ्या प्रवासी रेल्वेची संख्या वाढल्याने प्रवासी देखील वाढले आहेत. हि बाब लक्षात घेता स्थानकात कुणाच्या पार्शवभूमीवर आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी होते. शिवाय सॅनिटायझर देखील उपलब्ध असते. प्रवाशांना सोशल डिस्टिंगसिंगचे पालन करणे आणि मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. रेल्वेत प्रवास करतांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आव्हाहन देखील रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येते. स्थानकात बसण्यासाठीचे बाके, वेटिंग रूममधील आसने वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशी मागणी मात्र प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार