सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूम मध्ये २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ग्राहकाला टाटा कंपनीचे चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा

अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा

Sudarshan MH
  • Jun 24 2023 6:40AM
नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूम मध्ये २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ग्राहकाला टाटा कंपनीचे चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार २१ जून २०२३ रोजी  दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाटा शोरूम मध्ये सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत हे आलेल्या ग्राहकांना टाटा कंपनीची कारची माहिती देत असताना अनावधानाने कार सुरू झाली व एक्सीलेटर जोरात दिल्या गेल्याने दुसऱ्या कार वर जाऊन आदळली या अपघातात कारची साफसफाई करणाऱ्या कर्मचारी जितेंद्र वसंत शिरसाठ वय ४२ वर्ष हे दोघाही कारमध्ये दाबले गेले या ते गंभीर जखमी झाले त्यांना त्याच अवस्थेत शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जितेंद्र वसंत शिरसाठ यांना मृत घोषित केले याप्रकरणी २२ जून २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुभाष भगवान बच्छाव राहणार गुरुदत्त हाउसिंग सोसायटी शहादा यांच्या फिर्यादीवरून टाटा शोरूम मधील सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत वय २५ वर्ष राहणार लक्ष्मी नगर नंदुरबार यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४ अ २७९,३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हवालदार जगदीश पवार करीत आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार