सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातही आचारसंहितेचे तंतोतंत पालन आवश्यक* नाशिक : नाशिक, अहदमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार

विभागीय आयुक्त श्री.गमे पुढे म्हणाले की, लोकसभा व विधानसभेप्रमाणे आचारसंहिता राहणार असून

Sudarshan MH
  • Jan 1 2023 7:19PM
*नंदुरबार जिल्ह्यातही आचारसंहितेचे तंतोतंत पालन आवश्यक*
नाशिक : नाशिक, अहदमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाचही जिल्ह्यात नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ द्विवार्षिक निवडणूकीची निवडणूक आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. यामुळे विकास कामासंदर्भात निर्णय घेण्याबरोबरच राजकीय नेत्यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे ततोंत पालन करणे बंधनकारक बनले आहे. 

सरकार स्थापनेच्या खेळानंतर तब्बल काही महिन्यांनी वेगात आलेली विकास कामांची गाडी यामुळे काहीशी अडखळणार आहे. 

दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे तंतोतंतपालनाच्या सूचना केल्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी, उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त प्रज्ञा बडे-मिसाळ, उपायुक्त उन्मेष महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , उपजिल्हाधिकारी स्वाती थविल व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.गमे पुढे म्हणाले की, लोकसभा व विधानसभेप्रमाणे आचारसंहिता राहणार असून अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे कामकाज करावे. गरजेनुसार मतदान केंद्र वाढविता येणार आहे. अंतिम मतदार यादीच्या प्रती नाशिक विभागातील सर्व राजकीय पक्षांना वितरीत करुन नोंदी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक-2023 साठी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी असून आणि विभागातील पाचही जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक अधिकारी असणार आहेत. नाशिक विभागात एकूण 338 मतदार केंद्र असून 2 लाख 58 हजार 351 पदवीधर मतदार आहेत. 12 जानेवारी,2023 पर्यंत ऑनलाईन मतदार नोंदणी करता येणार असल्याने ज्यांची नोंदणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहनही श्री गमे यांनी यावेळी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार