सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धडगाव येथील गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून एस.आय.टी.ची स्थापना

धडगाव तालुक्यातील खडकी येथील तरुणीवर सामूहिक अत्याचार व खुन केल्याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या आदेशाने पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात एस.आय.टी.ची स्थापना करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Sep 17 2022 10:29AM

नंदुरबार - धडगाव तालुक्यातील खडकी येथील तरुणीवर सामूहिक अत्याचार व खुन केल्याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या आदेशाने पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात एस.आय.टी.ची स्थापना करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,धडगाव तालुक्यातील खडकी येथील तरुणीवर नराधमांनी सामूहिक अत्याचार करुन तिचा खुन केला होता.तरुणीला न्याय मिळावा यासाठी तिच्या वडिलांनी मयत तरुणीचा मृतदेह तब्बल दिड महिना मिठात पुरुन ठेवला होता. अखेर याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात रंजीत जत्र्या ठाकरे (रा.वावी), सुनील उर्फ कुटा प्रताप हाना वळवी,अमर उर्फ प्रताप गोटू उर्फ हाना वळवी (दोघे रा.कुवरखेत) या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०६,३०२,३७६(अ),(ड),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली असून या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशाने विशेष तपास पथक अर्थात एस.आय.टी.ची स्थापना करण्यात आली असुन तपास पथक प्रमुख म्हणून शहादा उप विभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे यांची तर सदस्यपदी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, महिला सुरक्षा कक्षाच्या सहा.पोलिस निरीक्षक श्रीमती नयना देवरे यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार