सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संघटनेच्या विरोधात पोलिसात अर्ज दिल्याच्या वादातून दोन जणांना जमावाची बेदम मारहाण

अर्ज दिल्याच्या वादातून दोन जणांना जमावाची बेदम मारहाण

Sudarshan MH
  • Aug 4 2022 5:26PM


परस्परविरोधी फिर्यादीतुन ३२ जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार -  संघटनेच्या विरोधात पोलिसात अर्ज दिल्याच्या वादातून तरुणाला जमावाने स्टीलचा पाईप,काठी व हॉकी स्टीकने बेदम मारहाण झाल्याची घटना शहरातील कोरीट नाका येथे घडली आहे.याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीतुन ३२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या घटनेत विनोद पप्पू पाडवी (२३,रा.इंदिरानगर संकुल जवळ) हा व त्याचे मित्र दि.२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता कोरीट नाका परिसरात ९ ऑगस्ट आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करीत असताना फायटर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोटारसायकलीने त्यांच्या जवळ आले. पाव्हबा आखाडे (रा.शिंदगव्हाण) याने विनोद पाडवी याला आमच्या व संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुध्द तुमच्या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष व सल्लागार यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज का दिला होता? असे सांगितले.दरम्यान आंबालाल ठाकरे याने विनोद पाडवी यांच्या हातावर स्टिलच्या रॉडने मारुन गंभीर दुखापत केली तर पाव्हबा आखाडे याने लाकडीने मारहाण केली.विश्वजीत बैसाणे (बॉबी) याने हॉकी स्टीकने डोक्यावर मारले.यावेळी विनोद पाडवी याचे मित्र सोडवासोडवी करीत असताना त्यांनाही वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.विनोद पप्पू पाडवी (२३,रा.इंदिरानगर संकुल जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाव्हबा आखाडे (रा.शिंदगव्हाण) ,विश्वजीत बैसाणे (बॉबी),आंबालाल ठाकरे,दिपक ठाकरे,लखन ठाकरे,नाग्या ठाकरे, सचिन ठाकरे, मुकेश ठाकरे (पोंगा),आशिष पिंपरे व इतर ७ ते ८ इसम यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या घटनेत पाव्हुबा भिकन आखाडे (रा.शिंदगव्हाण) हा मोटारसायकलीने जात असताना कोरीट नाक्याजवळ दि.२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शाहरुख गावीत याने त्याला थांबवून काल आमच्या विरुद्ध शहर पोलिसांत तक्रार का केली? असे बोलला.त्यानंतर दिनेश भिल,मोहन माळी,दानवीर,रमन्या (सर्व रा.नंदुरबार) यांनी व इतर ८ ते १० जणांनी वाईट शिवीगाळ करून पाव्हुबा आखाडे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.तपास हवालदार मंगलसिंग कोकणी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार