सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संवाद’ उपक्रमातंर्गत समाज कल्याण अधिकाऱ्यांचा* *शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्का

शासकीय वसतीगृहात एक दिवस मुक्का

Sudarshan MH
  • Aug 4 2022 6:40AM

*विद्यार्थ्यांशी मनमोकळया गप्पा करीत साधला संवाद…*

नंदुरबार, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : समाज कल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, याबाबत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी एक दिवस शासकीय वसतीगृहात मुक्काम केला व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्याच्या समस्या समजून घेतल्या. 

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ‘संवाद कार्यक्रम’ हा अभिनव उपक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व समाज कल्याण अधिकारी यांनी थेट विद्यार्थ्यांसोबत 27 व 28 जुलै रोजी शासकीय वसतीगृहात रात्रभर मुक्कामी राहून विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.

नंदुरबारचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धर्मराज नगर, नंदुरबार येथे तर समाज कल्याण निरीक्षक एस. के. गांगुर्डे व डी. बी. कोकणी यांनी शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह, मोहिदे त.श.ता.शहादा येथील वसतीगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे  नियमित व्याख्याने आयोजित करण्याबाबतचे सूचना त्यांनी गृहप्रमुखांना दिल्यात. तसेच वसतिगृहातील गृहप्रमुख व गृहपालांनी वसतीगृहात राहण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन देखील केले. 

‘संवाद’ उपक्रमातंर्गत आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे यांनी देखील स्वत: पुणे येथील वसतिगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा, जेवण व विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तर प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वसतिगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार