सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोर गरीब रुग्णांना संकट काळात मदत करणाऱ्या वसईकर दांम्पत्याचा

आदर्श घ्यावा- खा.डॉ.हिना गावीत

Sudarshan MH
  • Jun 8 2022 6:18AM

आदर्श घ्यावा- खा.डॉ.हिना गावीत

नंदुरबार- शहरातील प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेविका संगीता वसईकर व त्यांचे पती भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांनी शेकडो गोरगरीब रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून दिला.अनेकांची मोफत शस्त्रक्रिया केली.कोरोना काळात रुग्णसेवा करणारे वसईकर दांम्पत्य हे गोरगरीबांना की महिमा ठरले आहेत,असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी येथे बोलताना केले.
केंद्रातील मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रभाग क्रमांक १८ मधील चव्हाण चौकात मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार डॉ.हिना गावीत बोलत होत्या.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, केंद्र सरकारचे कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, अमळनेरचे मा.आमदार शिरीष चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती रवींद्रबापु चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ वर्षातील कामांचा उल्लेख केला.पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्ता होणार आहे असे सांगितले.
यावेळी प्रभाग क्रमांक १८ मधील नगरसेविका संगीता संतोष वसईकर व त्यांचे पती संतोष वसईकर यांनी घरोघरी जाऊन शासकिय योजना पासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती गोळा केली.त्यानंतर सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ८०० हुन अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला.उज्ज्वला गॅस योजना२५०लाभार्थी,३५० बांधकाम कामगार मजुर योजना,गावठी अनुदान योजना १५० लाभार्थी, संजय निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अपंग अनुदान योजना, नवीन रेशनकार्ड आदिंचा लाभ मिळवून दिल्याची माहिती वसईकर दांम्पत्यांनी दिली.
तसेच महात्मा फुले जिवनदायी योजनेतून अनेक रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करून दिली.कोरोना संकटात गोरगरीबांना मदतीचा हात दिला.रात्री-बेरात्री  दवाखान्याचे कोणतेही काम असो संतोष वसईकर यांनी कधी नकार दिला नाही.अशी ग्वाही अनेकांनी दिली. सर्व मान्यवरांनी   संतोष वसईकर हे करीत असलेल्या रुग्णसेवेचा कामाचे कौतुक केले.
यावेळी पालिका गटनेते अँड चारुदत्त कळवणकर, नगरसेवक गौरव चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी,भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र माळी, महिला शहराध्यक्ष योगीता बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाला चौधरी, गोकुळ भोई,आबा कुंभार, सुनील चौधरी, वसंत वसईकर, कांतीलाल वसईकर, मधुकर शेलार, महेंद्र मोरे आदींनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार