सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे खरीप हंगाम आढावा बैठकीत निर्देश

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते,

Nandurbar. MH
  • May 14 2022 3:51PM

**                                                  
नंदुरबार, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षासीमा वळवी,  आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रधुनाथ गांवडे, कृषी सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल.डी.भोये, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले की, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाची असावे. राष्ट्रीय कृत बॅकांनी कृषी कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे. 127 हेक्टर क्षेत्रात एंरडी लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे, खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापरा बाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. ठिबक सिंचन क्षेत्र वाढवावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा व गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ जास्तीत जास्त   शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करावी. वीज जोडणी पूर्ण करावी, शेतकऱ्यांच्या  मागणी नुसार खताच्या बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी.

यावेळी श्री.भागेश्वर म्हणाले की, खरीप हंगाम 2022 साठी भात,मका,ज्वारी,बाजरी,सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 23 हजार 377 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे.टन युरिया व 590 मे.टन डि .ए.पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार