सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मसावद नजिक 11 लाख 50 हजार रुपयांचे विषारी स्पीरीट जप्त

नंदुरबार - स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वाहनांची झाडाझडती घेतली असता एका वाहनातून बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे 5 लाख 50 हजार रुपये किमंतीचे एकुण 2200 लिटर स्पिरीटने भरलेल्या 11 प्लास्टीकच्या टाक्या आढळुन आल्या.

Nandurbar MH
  • Aug 1 2021 7:49PM

नंदुरबार - स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वाहनांची झाडाझडती घेतली असता एका वाहनातून बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे 5 लाख 50 हजार रुपये किमंतीचे एकुण 2200 लिटर स्पिरीटने भरलेल्या 11 प्लास्टीकच्या टाक्या आढळुन आल्या. याप्रकरणी दोन जणांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
       पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सक्त निर्देश दिले होते. त्या नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिनांक 30/07/2021 रोजी धुळे येथुन नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावाकडे चारचाकी वाहनातुन दारु बनविण्याकामी उपयोगी येणारे स्पीरीटची वाहतुक होणार असल्याची खात्रीशीर बातमी त्यांना प्राप्त झाली. त्यावरून कळमकर यांनी आपल्या पथकास तात्काळ कार्यरत केले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दिनांक 30/07/2021 रोजी शहादा शहरातील लोणखेडा येथील लाईफ केअर हॉस्पीटलजवळ सापळा लावला. सायंकाळी 6.30 वाजता म्हसावद गावाच्या दिशेला एक महिंद्र बोलेरो वाहन भरधाव वेगाने येतांना दिसली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्या संशयास्पद वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. वाहनांची तपासणी केली असता त्यात बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे 5 लाख 50 हजार रुपये किमंतीचे एकुण 2200 लिटर स्पिरीटने भरलेल्या 11 प्लास्टीकच्या टाक्या आढळुन आल्या. त्यांना परवाना आहे काय असे विचारले असता त्यांनी परवाना नसले बाबत सांगितल्याने, 5 लाख 50 हजार रुपये किमंतीचे एकुण 2200 लिटर स्पिरीट व 6 लाख रुपये किमंतीची महींद्रा बोलेरो चार चाकी वाहन क्रमांक MH43 AD-2560 असा एकुण 11 लाख 50 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला. चालक व क्लिनर शाहरुख नजिर मण्यार वय 24 रा. म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार आणि बाळु महादु डामरे वय 48 रा. अभय कॉलेज रोड, धुळे अशी आरोपींची नावे आहेत.सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री. देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेकॉ/ दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, शोएब शेख, रामेश्वर चव्हाण यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार