सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: दाम्पत्यावर चाकूने केले वार; आरोपी पसार

नंदुरबार - खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या तरुणाने चाकूहल्ला करून दांपत्याला गंभीर जखमी केले. जखमी झालेले पती-पत्नी वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत,

NANDURBAR MH
  • Dec 10 2020 11:50AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या तरुणाने चाकूहल्ला करून दांपत्याला गंभीर जखमी केले. जखमी झालेले पती-पत्नी वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत, तर पोलीस फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.       पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील प्रवीण उर्फ आबा आधार कोळी या तरुणावर एका खून प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणात शहादा तालुक्यातील काकर्दे येथील रहिवासी हेमंत दिलीप कोळी वय 34 यांनी दिलेल्या माहितीमुळे आपल्यावर तो गुन्हा नोंद झाला होता, असा समज प्रवीण कोळीने करून घेतला. त्या रागातूनच प्रवीण यांनी हेमंत कोळी आणि त्यांची पत्नी सुनिता कोळी वय 29 यांच्यावर चाकूने हल्ला केला. हेमंत यांच्या उजव्या काखेत घुसल्याने मोठी जखम झाली तर सुनिता यांच्या डोक्यावरही गंभीर जखम झाली. ग्रामस्थांनी ताबडतोब धावपळ करून वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल केले. दरम्यान हल्लेखोर प्रवीण कोळी फरार झाला. सारंग खेडा पोलीसांनी गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार