सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आता डबल मास्क आणि फेस शिल्ड वापरा, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश*

मुंबई : कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, आता डबल मास्क लावण्याची वेळ आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 28 2021 8:27AM


मुंबई : कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, आता डबल मास्क लावण्याची वेळ आली आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेने दिल्यानंतर, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांना फेस शिल्ड आणि डबल मास्क घालण्याचे आदेश, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

मुंबईत करोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतत बंदोबस्त करावा लागत आहे. मुंबई पोलीस सतत रस्त्यावर , लोकांमध्ये असतात. याचा परिणाम पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्याही मोठी आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्वाचे आदेश काढले आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी फेस शिल्ड घालावी. त्याचमाणे डबल मास्क घालावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार