सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात; सीबीआयनंतर आता ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणखी अडचणीत आले आहेत.

Sudarshan MH
  • May 11 2021 1:40PM


मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणखी अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयानं देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. या आरोपांचा पुरावा म्हणून परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे पुरावेही दिले होते. या आरोपांमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. 

अॅड. जयश्री पाटील यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं सोपवावी, अशी मागणी केली होती. न्यायालयानं ती मान्य करत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. 

काही दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयनं देशमुख यांच्या घरावर व अन्य मालमत्तांवर धाडी घातल्या व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या या कारवाईला देशमुख यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र, सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनं आता देशमुख यांच्या मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार