सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाराष्ट्र सरकार हे मुघल सरकार’-आचार्य तुषार भोसले

मुंबई:”उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात मुघलांच सरकार आहे, हे पुन्हा आता सिद्ध झाले आहे.

Sudarshan MH
  • Jun 12 2021 9:46AM


मुंबई:”उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात मुघलांच सरकार आहे, हे पुन्हा आता सिद्ध झाले आहे. समस्त वारकरी संप्रदायाची मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावून वारकऱ्यांच्या तोंडाला पान पुसून महाराष्ट्राची पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाविकास आघाडी सरकार द्रोही सरकार आहे”, असा घणाघात आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, या निर्णयानंतर भाजपने याला विरोध केला आहे.


वारकऱ्यांना कोविडचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सगळ्याच गोष्टींना परवानगी आणि वारीला मात्र विरोध हे न कळण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली. शरद पवार यांनी देखील आजारातून उठल्यावर हॉटेल चालकांची काळजी केली, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक
निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावल्यानं भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली असून भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांची ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे मुघलांचे सरकार असून महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. ब्रिटीश, मुघलांच्या काळात ही पायी वारीची परंपरा खंडित झाली नाही ती या सरकारने केली असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, तो खपवून घेणार नाही. निर्बंधासह पायी वारीची परंपरा जोपासण्यावर वारकरी संप्रदाय ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार