सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मालाड मालवणी मधील इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 10- मुंबईत मालवणी येथे तीन मजली ईमारत बाजूच्या दुमजली घरांवर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Jun 10 2021 5:11PM


मुंबई दि. 10- मुंबईत मालवणी येथे तीन मजली ईमारत बाजूच्या दुमजली घरांवर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून  8 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून  त्यांच्या कुटुंबियांना मुंबई मनपा ने 5 लाख रुपयांची सांत्वनपर मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 आज दुपारी मालाड मालवणी गेट नंबर 8 येथील न्यु कलेक्टर कॉलनी येथील दुर्घटनाग्रस्त स्थळाला ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेची सखोल  चौकशी करून दोषी मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये याची मुंबई मनपा ने खबरदारी घ्यावी. असे आवाहन ना रामदास आठवले यांनी  मुंबई मनपा आणि राज्य सरकार ला केले आहे. 

यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव; तालुका अध्यक्ष सुनील गमारे; मुंबई महिला आघाडी अध्यक्ष ऍड.अभया सोनवणे; व्यापार आघाडी अध्यक्ष पोपटशेठ घनवट; आदी अनेक रिपाइं कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार