सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

1 ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल

Abhimanyu
  • Sep 10 2022 9:35PM
मुंबई  : तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबरपासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. आजपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8.30 ही असेल व प्रतिदिवशी 30 लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल.

राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील. सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळविण्यात आले आहे. दिवाळीमुळे 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार