सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई पोलिसांकडून सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवार यांना क्लिन चिट

महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चिट दिली आहे.

Shruti Patil
  • Apr 24 2024 9:19AM

मुंबई: महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चिट दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी जय अ‍ॅग्रोटेकच्या संचालक पदाचा २ वर्षापूर्वी म्हणजेच २०१० रोजी राजीनामा दिला. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयाने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनी लॉड्रींगचा ठपका ठेवत तपास सुरु केला होता. 

जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारात जय ॲग्रोने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज स्वरुपात २०.२५ कोटी रुपये दिले होते. २०१० मध्ये गुरू कमोडिटीने जरंडेश्वर को - ऑप शुगर मिलची लिलावाद्वारे ६५.७५ कोटींमध्ये खरेदी केली होती. जरंडेश्वर साखर कारखान्याला गुरु कमोडिटीने गिरणी भाडेतत्त्वावर दिली. यामध्ये अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे संचालक होते. जरंडेश्वर साखर कारखान्याने गुरु कमोडिटीजला ६५.५३ कोटी भाडे दिले. गिरणीच्या लिलावादरम्यान कोणतेही गुन्हेगारी कृत्य झालेले नाही म्हणूनच आर्थिक गुन्हे शाखेने सुनेत्रा पवार यांना क्लिन चिट दिल्याची माहिती समोर आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार