सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाविकासआघाडीचे कार्यकर्त्यांनी एकजूटीने काम करावे : खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे

Sudarshan MH
  • Nov 28 2020 6:42PM
प्रतिनिधी: दिपक चव्हाण 


 केंद्र सरकारकडून पाठविलेल्या ईडी च्या नोटीस व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले. ईडी चा पायगुण लय भारी. आता शिवसेनेला ईडीची नोटीस पाठविली आहे, शिवसेनेला आणखी काय मिळेल. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेन. आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. महाविकास आघाडीचे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे  उमेदवार योग्यच असल्याने ते निवडून येणारच असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त शनिवार (दि.२८) रोजी येथील वैशाली मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या  कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

 याप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, एसआरपी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, विठ्ठल शिंदे, नगरसेवक गणेश काकडे, गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, युवक  जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक किशोर भेगडे, जीवन गायकवाड, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, शिवसेना नेत्या शादान चौधरी, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगिता शेळके, युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, विलास मालपोटे, निशा पवार, शितल हगवणे, ज्योती शिंदे व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या  मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन संपर्क साधावा. आपला उमेदवार प्रामाणिकपणे काम करणारा व स्वच्छ प्रतिमा असलेला आहे. त्यामुळे आपण एक चांगले नेतृत्व देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. 
 

मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले, भाजपने मावळ तालुक्यातून घड्याळ व पवार मुक्त करण्याची स्वार्थी घोषणा केली. आता भाजपला पाहायला व ऐकायला नागरिकांना वेळ नाही. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी आपले उमेदवार आवश्यक आहेत. तळेगाव दाभाडे – शिक्रापूर मार्गासाठी ३०० कोटी व लोणावळा येथे उप जिल्हा रुग्णालयासाठी ६४ कोटी मंजूर केले आहेत.  

  महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पाडून व महाविकास आघाडीच्या उमेदवारास मावळातुन सर्वाधिक मते देण्यासाठी सक्रीय होण्याचे आवाहन  केले.

 यावेळी आमदार संजय जगताप, प्रदीप गारटकर, राजू खांडभोर, यादवेंद्र खळदे आदींनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.सूत्रसंचालन चंद्रजित वाघमारे व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी केले.
आभार नगसेवक गणेश काकडे यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार