सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तहसिल कार्यालयासमोर किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या निदर्शने.

पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या निदर्शने

Sudarshan MH
  • Nov 4 2020 10:01PM
अहमदनगर
       पारनेर(रावसाहेब पारधी)





         महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवार दि.५ रोजी दु.१२.३० वा. पारनेर तहसील कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करुन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

   मा.जिल्हा परीषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली   कांदा आयात बंद करावी तसेच ईतर मागण्या साठी ही निदर्शने करण्यात येनार आहेत 

शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत  त्याला वाचा फोडण्यासाठी किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने  करण्यात येणार आहेत यामधील प्रमुख मागण्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे जे तीन कायदे केले आहेत ते रद्द करावेत,केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करुन व इजिप्त, अफगाणिस्तान व इतर देशांमधून कांदा आयात करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तरी कांदा आयात बंद करावी,अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे म्हणून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी.,सन २०१८ रब्बी हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो तात्काळ मिळावा,महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफी पासून वंचित असलेले पात्र शेतकरी व नियमित फेड करणारे शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५०००० ची माफी लवकरात लवकर मिळावी,वीज बिल माफ करण्यात यावी विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे. गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी नांगरटी चे पैसे आलेले आहेत मात्र खाते नंबर व इतर काही अडचणींमुळे ते पैसे आद्यप आलेले नाहीत त्याचेही शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप त्वरित करण्यात यावे या व इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे अध्यक्ष दादाभाऊ गायकवाड सचिव कैलास शेळके बबनराव गंधात्ते संतोष खोडदे फुलाबाई आदमने गणेश कावरे बबन रावडे यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार