सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्रामपंचायती मधुन माहिती मागवल्याच्या रागातुन खोटा गुन्हा दाखल....

पाबळ ता पारनेर येथील निवृत्त कला शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते रामदास गणपत कवडे

Aishwarya dubey
  • Jul 17 2020 2:16PM
धक्कादायक....
पारनेर
पाबळ ता पारनेर येथील निवृत्त कला शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते रामदास गणपत कवडे यांनी त्यांच्या वस्तीवर झालेल्या 
कामाची माहीती ग्रामपंचायत कार्यालयाकडे मागवली होती. परंतु सहा महिण्यांपुर्वी  सरपंच पदावरून दुर झालेल्या माजी सरपंच संदेश भाऊसाहेब कापसे 
यांना याबाबत संताप अनावर झाल्याने त्यांनी माहीती मागविणारे रामदास कवडे यांना 
ग्रामपंचायत कार्यालयातच दमबाजी  व शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर काढले. तसेच त्यावेळी उपस्थित असलेल्या विद्यमान सरपंचांनाही माहीती दिल्याने झापले. की , मी तुला सरपंच केले .... !   तु मला न विचारता या लंगड्याला कशाला माहिती दिली..... ! हा कोण लागला माहिती घेणारा असे म्हणत कार्यालयात दहशत निर्माण केली व कवडे यांना 
कार्यालयाबाहेर काढले.
    रामदास कवडे यांनी मागीतलेली माहीती त्यांचेच 
वस्तीवर झालेल्या कामाची होती.
तेथील कामावर मोठा निधी  खर्च होवूनही ते काम 
निकृष्ट असल्याने त्यांनी ही माहीती मागवली असल्याचे सांगितले.
   त्यानंतर माजी सरपंचाकडून झालेल्या दादागीरीची तक्रार कवडे यांनी 
पारनेर पोलिसांकडे केली. याबाबतची माहीती माजी सरपंचाला 
समजताच त्याने रामदास कवडे यांच्या विरोधात एक आठवड्याच्या कालावधीनंतर पोलिसांच्या मदतीने  त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे., असा  आरोप कवडे यांनी केला. पारनेर पोलिसांनी  कवडे यांच्या विरोधात भा.द.वि ४५१ कलमाने गुन्हा दाखल केल्याचे सांगितले .कवडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची आठवडा उलटुनही दखल न घेणारे पोलिस माजी सरपंचाच्या खोट्या तक्रारीचा गुन्हा तात्काळ
नोंदवला याचे गौडबंगाल काय
समजायला तयार नाही.
  कवडे यांच्यावर  पारनेर पोलिसांनी पुर्णपणे खोटा 
गुन्हा दाखल केला असल्याचे लोकजाग्रती सामाजीक संस्थेने म्हटले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार