सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कृषि संजीवनी सप्ताहा मुळे पिकांची गुणवत्ता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्‍त 1 जुलै हा दिवस ‘‍कृषि दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्‍यात आला आहे.

Manish Gupta
  • Jul 5 2020 1:39PM
मनीष गुप्ता 
पालघर :-  महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्‍त  1 जुलै हा दिवस ‘‍कृषि दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्‍यात आला आहे. . यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृद्ध व्हावा  यासाठी दिनांक 1 ते 7 जुलै या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जात  आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यावर्षी “पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ” या त्रिसुत्रीच्या  माध्यमातून कृषि विभाग काम  करणार  असल्याची  माहिती कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे   पालकमंत्री  दादाजी भुसे यांनी दिली .  
   हमरापूर,  ता. वाडा  येथील औजारे बँक, गांडूळखत व मूरघास प्रकल्प भेटी दरम्यान गावकरी यांच्याशी संवाद  साधला त्यावेळी पालकमंत्री श्री.  भुसे बोलत  होते. 
यावेळी आमदार श्री फाटक, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, वाडा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी   काशिनाथ तरकसे वाडा तहसीलदार उद्धव कदम  आदि उपस्थित होते 
   पालकमंत्री श्री. भुसे यांनी, औजारे बँक, गांडूळखत प्रकल्प पाहणी केली तसेच शेतकरी यांना युरिया खाताचे वाटप केले. 
 खरीप हंगाम यशस्‍वी करण्‍यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत पोहचविण्‍यासाठी राज्‍यातील कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्‍हा परीषद, कृषि विद्यापीठे / कृषि विज्ञान केंद्रे, आत्‍मा, पोक्रा, मधील कार्य करणारे कृषितज्ज्ञ, कृषिमित्र हे शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत .  
या सप्ताहात गावांमध्‍ये सुक्ष्‍म नियोजन, गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. विविध गावात कृषि विषयक राबविलेल्‍या नाविन्‍यपुर्ण उपक्रमांना कृषितज्ज्ञांच्या  शेतकऱ्यांसह भेटी दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील  कृषि पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी तसेच नाविन्‍यपुर्ण, प्रयोगशील व उल्‍लेखनीय काम करणा-या शेतक-यांच्‍या सत्‍काराचे व त्‍यांच्‍या मार्गदर्शनपर व्‍यख्‍यानाचे आयोजन, कृषिविषयक मोफत सल्ला, एम किसान पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे वर्गणीदार वाढविण्‍याची मोहिम, विविध पीक स्‍पर्धा आणि पुरस्‍कारांबाबत प्रचार- प्रसिध्‍दी, जलयुक्‍त शिवार अभियान, एकात्‍मीक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, मागेल त्‍याला शेततळे याबाबतच्या यशोगाथा आदिंबाबत  या सप्ताहात भर दिला जात आहे , असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.  
     याचबरोबर पीक उत्‍पादन खर्च कमी करण्‍याबाबत, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत जनजागृती, प्रसिध्‍दी व मार्गदर्शन केले जाईल. जमीन आरोग्‍य पत्रिका वितरण, परंपररागत कृषि विकास योजना, केंद्र व राज्‍य शासनाच्‍या कृषि व कृषि संलग्‍न विभागांच्‍या शेतक-यांसाठी असलेल्‍या योजना, कापसावरील शेंदरी बोंड आळी, मकावरील लष्‍करी अळी, ऊसामधील हुमणी आणि सोयाबीनवरील मोझॉक व पिवळा मोझॅक व्‍यवस्‍थापनाबाबत कृषितज्ज्ञ बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील. रुंद सरी वरंबा यंत्र वापराची व पेरणीची प्रात्‍याक्षिके, बिजप्रक्रिया, कडधान्‍य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहुपीक पध्‍दतीचा प्रसार, एकात्‍मीक शेती पध्‍दती संकल्‍पनेबाबत, हायड्रोफोनिक्‍स, हिरावा चारा निर्मिती,  बी-बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना घ्‍यावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मुलस्‍थानी जलसंधारणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन व आत्‍पकालीन पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्‍यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार