सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्षुल्लक कारणावरून पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांना कु:हाडीने मारहाण !

बुलढाणा : गत काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यात किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप चालकांवर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकार घडले.

Yogesh
  • Jul 15 2020 8:56PM


(योगेश शर्मा)
.
बुलढाणा : बुलढाणा : गत काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यात किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप चालकांवर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकार घडले. यामध्ये बुलढाणा मध्ये तर बॉटल मध्ये पेट्रोल न दिल्याचा राग मानून चक्क पंप चालकाच्या कैबीन मध्ये विषारी साप सोडल्याचा नवीन प्रकार घडला. तर नुकतेच चिखली शहरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरातील रस्ता रहदारी साठी नसल्याचे हटकल्या वरून पंप चालकासह कर्मचाऱ्यांवर स्थानिक काही लोकांनी प्राणघातक हल्ला करत पंप चालकाला आणि कर्मचाऱ्यांना गंभीररीत्या जख्मी करून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याचा प्रकार घडला. 
 पेट्रोलपंपाच्या परिसरातून जाणा:यास हा रहदारीचा रस्ता नसल्याने येथून जायचे नाही, असे म्हणून हटकल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने पेट्रोलपंप चालकासह इतर दोघा जणांना कु:हाड, रॉड व दगडाने बेदम मारहाण केल्याने तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एका गंभीर जखमीला उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. ही घटना स्थानिक मेहकर फाटय़ावर 14 जुलैच्या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
स्थानिक मेहकर फाटय़ावरील सतगुरू हायवे सव्र्हीसपंपव्दारे हिंदुस्थान पेट्रोलीयमचा पंप राजेश गुलाबराव मोरे वय 48 यांच्याव्दारे चालविण्यात येत आहे. 14 जुलै रोजी पेट्रोलपंप चालक राजेश मोरे, त्यांचा चुलत भाऊ सर्जेराव मोरे, शिवाजी मोरे, सिध्दार्थ अवसरमोल व मुलगा सिध्दांत हे पेट्रोलपंपावर उपस्थित असताना सकाळी साडेआठच्या सुमारास पेट्रोलपंपाला लागूनच असलेल्या शंकर फौजी धाब्यावर काम करणारा आदित्य भुसारी हा पेट्रोलपंपाच्या आवारातून जात असताना त्यास राजेश मोरे यांनी अडविले व हा रहदारीचा रस्ता नाही, तू या रस्त्याने जावू नको असे म्हटले असता आदित्य भुसारी याने त्यास ढकलून देत शिवीगाळ केली व तेथून धाब्यावर निघून गेला. दरम्यान राजेश मोरे हे आपल्या कॅबीनमध्ये बसले असतान शंकर शेषराव चव्हाण व आदित्य भुसारी या दोघांनी हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेवून कॅबीनमध्ये बसलेल्या राजेश मोरे यांच्या धावून जात त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला, छातीवर व हाताला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. दरम्यान मोरे यांना या हल्ल्यातून वाचविण्यासाठी धावून आलेल्या सर्जेराव मोरे व सिध्दांत मोरे यांच्यावर देखील हल्ला चढविण्यात आला. दरम्यान शेषराव माणीकराव चव्हाण, मिथून शेषराव चव्हाण व धाब्यावर काम करणारा नाटेकर असे आणखी तीघेजण लाठय़ाकाठय़ासंह येवून त्यांनी देखील मारहाण चालविली. याचवेळी आदित्य भुसारी याने धाब्यावर पळून जाऊन कु:हाड आणली व सर्जेराव मोरे याच्या डोक्यावर, पायावर व हातावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या मारहाणीनंतर आरोपींनी याठिकाणी जोरजोरात आरडाओरड करीत मोरे यांच्या संपूर्ण खानदाणीला जीवानिशी संपविण्याची धमकी दिली सोबतच पेट्रोलपंपावरील कॅबीन, पेट्रोल-डिझल मशीनची तोडफोड केली असल्याची तक्रार राजेश मोरे यांनी चिखली पोलिसांत दाखल केली आहे.
या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी शंकर शेषराव चव्हाण, आदित्य भुसारी, शेषराव माणकिराव चव्हाण, मिथुन शेषराव चव्हाण  आणि नाटेकर या पाच इसमांनी गैरकायदयाची मंडळी जमवून हातात घातक शस्त्ने, लाठया , काठया , कु:हाड, लोखंडी रॉड घेवून फिर्यादी राजेश मोरे, सर्जेराव मोरे, सिध्दन्त मोरे यांचेवर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने जाणिवपूर्वक प्राणघातक हल्ला व मारहाण करून गंभीर जखमी करणो व शिवीगाळ करून धमकी देवून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी कलम 143, 147, 148, 149, 3क्7, 326, 5क्4, 427, 269, 27क्, कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेट अॅक्ट व कलम 3 साथरोग अधिनियम 1897 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणोदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि किरण खाडे, पांडूरंग शिंदे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार