सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*विविध बारा देशांचे गुंतवणूकदार राज्याच्या दारी*

आर्थिक प्रगतीसाठी उद्योग व्यवसायांना मार्ग प्रशस्त झाल्याने आज ऑनलाईन उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन)चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला.

Snehal Joshi
  • Jun 17 2020 10:16PM
तीन महिने कोरोना महामारी मुळे व्यवसाय, उद्योग बंद झाले. त्यातून महाराष्ट्रातील प्रवासी मजदूर आपल्या गावी परतले. अनेक प्रश्नांनी महाराष्ट्र बेजार झाला. आर्थिक प्रगतीसाठी उद्योग व्यवसायांना मार्ग प्रशस्त झाल्याने आज ऑनलाईन उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन)चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला.यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत,गुंतवणूकदार.उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते.विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे. तो सार्थ करुत हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड ७६० कोटी, हेंगली  (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-२, पुणे २५० कोटी आणि १५० रोजगार,असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे ५६० कोटी,वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर ८२० कोटी,हिरानंदानी ग्रुप    (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव १५० कोटी आणि २५०० रोजगार ,असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे ११०० कोटी आणि २०० रोजगार,इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे १२० कोटी आणि ११०० रोजगार,पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव १००० कोटी रोजगार १५००,इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड १५०० कोटी आणि रोजगार २५००,रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे १५०० कोटी,युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड ५००० कोटी आणि रोजगार ३०००,ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे ३७७० कोटी आणि २०४२, या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुकेश आघी व वेणुगोपाल रेड्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. डब्ल्यूएआयपीएचे बोस्तजन स्कलार यांनी देखील डब्ल्यूएआयपीएच्या वतीने स्वाक्षरी केली.इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.दरम्यान, या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्याऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार