सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशातील पहिल्या खादी फेब्रिक फुटवेअरचा ना. गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

देशातील पहिल्या खादी फेब्रिक फुटवेअरचा ना. गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ खादी उत्पादन निर्मिती उद्योगात प्रचंड रोजगार क्षमता

Snehal Joshi .
  • Oct 23 2020 11:10PM
खादी उत्पादन निर्मिती उद्योगात प्रचंड रोजगाराची क्षमता आहे. आकर्षक डिझाईनच्या खादीच्या उत्पादनांना बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या तुलनेत देशातील खादीच्या वस्तूंची किंमत कमी आहे. त्यामुळे देशात खादीच्या उत्पादनांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
व्हिडिओ कॉन्फसरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांच्या हस्ते आज देशातील पहिल्या खादी फेब्रिक फुटवेअरचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनाराण आदी उपस्थित होते.
उत्तम दर्जाची खादीची पादत्राणे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कारागिरांनी तयार केली आहे. सूती, रेशमी, खादी आदींचा वापर करून महिला व पुरुषांसाठी विविध आकर्षक डिझाईनची पादत्राणे तयार करण्यात आल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महिलांसाठी लागणारी पादत्राणे बनविण्यासाठी काश्मीरची पश्मीना शॉल, पटोला सिल्क, बनारसी सिल्क, मधुबनी प्रिंट सिल्क साडी, रेशमी व सूती कपड्यांचा वापर करण्यात आला आहे, तर पुरुषांसाठी लागणार्‍या पादत्राणांसाठी खादी डेनिमचे कपडे, सुती कपडे, वूल, खादी पॉलि वस्त्रांचा उपयोग करण्यात आला आहे. बूट आणि सँडलच्या एका जोडीची किंमत 1100 रुपयांपासून 3300 रुपयांपर्यंत आहे. महिलांसाठी 15 विविध आकर्षक डिझाईनमध्ये पादत्राणे तयार करण्यात आले आहेत, पुरुषांसाठी विविध 10 डिझाईनमध्ये पादत्राणे तयार करण्यात आले. या पादत्राणांची विक्री   ई पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेतून खादी फेब्रिकची पादत्राणे बनविण्याची संकल्पना तयार झाली आहे. भारतीय फुटवेअरची दरवर्षीची उलाढाल 50 हजार कोटी रुपयांची असून यात 32 हजार कोटी घरगुती बाजार व 18 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचा समावेश आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- चीन. संयुक्त राज्य अमेरिकेनंतर भारत सर्वाधिक पादत्राणे बनविणारा तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. खादी फेब्रिकची पादत्राणे हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नव्या संकल्पनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार