सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकसहभागातून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व्हावी : ना. गडकरी

लोकसहभागातून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व्हावी : ना. गडकरी ‘असोचेम फाऊंडेशन वीक 2020’

Snehal Joshi .
  • Dec 17 2020 7:27PM
सर्वच क्षेत्रातील उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठ़ी लोकसहभागाची आवश्यकता असून लोकसहभागातून या क्षेत्रात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. केवळ शासकीय निधीतून सर्व सुविधा उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळेच लोकसहभाग ही आजची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘असोचेम फाऊंडेशन वीक 2020’ या कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. असोचेम या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देताना ते म्हणाले- उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात या संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, असे मत मांडताना ना. गडकरी यांनी ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे निर्माण करण्याची ही वेळ असल्याचे सांगितले. रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले लोक परत गावांकडे वळावे ही अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले- फक्त स्मार्ट सिटी करून चालणार नाही तर स्मार्ट गावे बनविणे ही आजची आवश्यकता आहे. यासोबतच सेंद्रीय शेती आणि कृषी मालाची निर्यात करणे, हस्तकला, हातमाग अशा लहान उद्योगांना अधिक प्रोत्साहन देणे, त्यांचा विकास करणे फायदेशीर आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या खूप क्षमता असल्याचेही ते म्हणाले.
पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद हे चार पायाभूत सुविधांचे खांब असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- या चारही वस्तू देशात भरपूर आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यक्रम आखला गेला पाहिजे. पाण्यासाठी, रस्त्यांच्या क्षेत्रासाठी, ऊर्जा क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यक्रम असावा. महामार्ग व रस्त्यांच्या जाळ्यांसाठी एक कार्यक्रम आखला जावा. लोकसहभागातून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक झाली नाही तर विकास कामांना गतीही प्राप्त होणार नाही. रस्त्यांचे जाळे विणले तर अनेक सुविधा प्राप्त होतात, म्हणून रस्त्यांचे जाळे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 60 हजार किमीचे रस्ते बांधले असून भविष्यातही 60 हजार किमीचे नियोजन आहे. भारतमाला प्रकल्पांअंतर्गत 15 लाख कोटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. या बहुतेक प्रकल्पात परकीय गुंतवणूकदार गुंतवणुकीस तयार आहेत. पण आम्ही 500-600 कोटींचे प्रकल्प करून भारतीय गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करीत आहोत.
लॉजिस्टिक पार्क, बस पोर्ट, पार्किंग प्लाझा ही सर्व एनएचआयची उत्पन्न मिळविण्याची साधने आहेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- दरवर्षी येणार्‍या पुरामुळे आपल्याकडे 1.40 लाख कोटींची हानी होते. ही हानी रोखण्यासाठी वॉटरग्रीड बनविली तर एका क्षेत्रातील पाणी दुसर्‍या क्षेत्राकडे वळविता येते. याप्रमाणेच पॉवर ग्रीडही बनविता येते. वॉटरग्रीडमुळे तर पाणीटंचाई भासणारच नाही. शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. उत्पादन वाढेल, रोजगार उपलब्ध होतील. याशिवाय क्रूझ पर्यटन, जैविक इंधन निर्मिती, कृषी क्षेत्राने इंधन निर्मितीकडे वळावे अशा अनेक विषयांकडे ना. गडकरी यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाला निरंजन हिरानंदानी, बाळकृष्ण गोयनका, प्रीती मल्होत्रा, विनोद अग्रवाल आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार