सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अर्थव्यवस्था मजबुतीसाठीच 20 लाख कोटींचे पॅकेज : नितीन गडकरी

एन्टरप्रिनर्स असोसिएशन साऊथ एशिया पदाधिकार्‍यांशी ई संवाद

Snehal Joshi
  • Jul 18 2020 5:32PM
कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यासाठी व अर्थव्यवस्थेला गतीने चालना मिळावी व सर्वच क्षेत्रातील उद्योजक व व्यापार्‍यांना दिलासा मिळावा म्हणूनच केंद्र शासनाने 20 लाख कोटींचे पॅकेज दिले असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
एन्टरप्रिनर्स असोसिएशन साऊथ एशिया पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोविड-19 मुळे संपूर्ण जग वेठीस धरले आहे. संपूर्ण जग कोरोनाचा सामना करीत आहेत. एवढेच काय तर अर्थव्यवस्थेसमोरही आव्हान निर्माण झाले असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- जोपर्यंत कोरोनावर प्रतिबंधित लस शोधली जात नाही, तोपर्यंत ही सर्व आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. यावर संशोधन सुरु आहे. लवकरात लवकर प्रतिबंधात्मक लस शोधली जाणार आहे. कोरोनामुळेच स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था ढासळली, व्यापार बंद आहे, या सर्वांसाठी हे 20 लाख कोटींचे पॅकेज आहे. यातूनही सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसाठी शासनाने एमएसएमईला 3 लाख कोटींचे पॅकेज दिले आहे. एमएसएमईने उद्योगांना भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून 50 हजार कोटी वेगळे काढून ़फंड्स ऑफ फंड्सच्या माध्यमातून उद्योगांना भांडवली बाजारातून भांडवल उभे करून देण्यास मदत करणार आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
एनबीएफसी, बँका यांना एमएसएमई व पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. तसेच या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसही परवानगी मिळाली असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- देशात अद्ययावत तंत्रज्ञान आहे, तरुण कौशल्याधारित मनुष्यबळ आहे, मोठा बाजार आहे, अशा स्थितीत भारतात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. उद्योगांना आपला उत्पादनाचा खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागात उद्योग आणि उद्योगांचा विकास झाला तर रोजगार निर्माण होतील व अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. 88  हजार कोटींची ही अर्थव्यवस्था 5 लाख कोटीपर्यंत नेण्याचे आमचे नियोजन आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण व कृषी भागातील लहान लहान उद्योगांपासून निर्माण होणारी अर्थव्यवस्था ही सध्याच्या स्थितीपेक्षा 5 ते 6 पट अधिक करण्याचे प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
आयात कमी आणि भारतीय उत्पादनांची निर्यात अधिक करणे, मासेमारीची अर्थव्यवस्था 6 पटीने वाढविण्याची क्षमता आपल्या देशात आहे, जैविक इंधने बनवून ती अर्थव्यवस्था वाढविणे, खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या वस्तूंची अर्थव्यवस्था विकसित करणे अशा अनेक विषयांना ना. गडकरी यांनी आज स्पर्श करून अर्थव्यवस्थेला मजबुतीकडे नेणे व परकीय भांडवल या देशात अधिकाधिक आणून रोजगार निर्मिती करणे यावर अधिक भर दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार