सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*प्रवासासाठी योग्य नसलेली विमाने मालवाहतुकीसाठी वापरयोग्य बनवता येतील काय ?--- गडकरी*

हवाई माल वाहतुकीचा खर्च प्रचंड असून शेतकरी उद्योजक व व्यापार्‍यांना हा माल वाहतूक खर्च परवडणारा नाही. हा खर्च कमी झाल्यास देशातंर्गत निर्यातीसाठी माल वाहतूक परवडेल. असे मत केेंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Snehal Joshi
  • Jul 1 2020 11:07PM
हवाई माल वाहतुकीचा खर्च प्रचंड असून शेतकरी उद्योजक व व्यापार्‍यांना हा माल वाहतूक खर्च परवडणारा नाही. हा खर्च कमी झाल्यास देशातंर्गत निर्यातीसाठी माल वाहतूक परवडेल. असे मत केेंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशातील माल वाहतूकदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या क्षेत्रात प्रगतीच्या खूप संधी आहेत. त्यावर विचार करून मार्ग शोधता आला पाहिजे. असे सांगताना गडकरी म्हणाले, मासेमारीची अर्थव्यवस्था आता आम्ही 1 लाख कोटीवरून 6 लाख कोटीपर्यंत नेणार आहोत. नागपूरचा संत्रा, जळगावची केळी, बिहारमधील लिची या फळाची वाहतूक देशातंर्गत होऊ शकते.पण खर्च कमी केल्याशिवाय शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना ही माल वपाहतूक परवडणे शक्य नाही. त्यांनी यावेळी झिंग्याचे उदाहरण दिले. भारतात झिंगे 700 रुपये किलो आहेत. तेच दुबई व अन्य देशात 5 हजार रुपये किलोपर्यं आहेत. ही माल वाहतूक शक्य झाली तर देशाचे उत्पन्न डॉलरमध्ये वाढेल. फळे, भाज्या, फुले आणि मासोळी यांची देशातंर्गत हवाई माल वाहतूक शक्य झाली पाहिजे. प्रवासासाठी योग्य नसलेली अनेक विमाने नुसती पडून आहेत. त्या विमानांमध्ये बदल करून तो माल वाहतुकीसाठी मिळू शकतात काय. याचा विचार झाला पाहिजे. यासाठी मिळणारी परवानगी आणि प्रक्रिया या त्वरित करता  आल्या पाहिजे. यासंबंधात गतिशील निर्णय घेता आले पाहिजेत. तरच ते फायदेशीर ठरतील. तसेच या संदर्भात निश्‍चित असे धोरण आखले गेले पाहिजे. प्रवासासाठी योग्य नसलेली विमाने मालवाहतुकीसाठी वापरयोग्य बनवता येतील काय, यावर अभ्यास होणे आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले. देशातंर्गत माल वाहतूक शक्यतो जलमार्गाने झाल्यास अत्यंत स्वस्त दरात होते. असे सांगून गडकरी म्हणाले, हवाई माल वाहतूक खर्च कमी होणार नाही. तोपर्यंत या क्षेत्राचा आवाका वाढणार नाही. व्यापार वाढणार नाही. हे क्षेत्र शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. असेही गडकरी यावेळी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार