सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आम्ही वरमाला घातल्यात ! संजय राऊत यांची सारवासारव*

शिवसेनेतील असंतुष्ट पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची बेचैनी वाढली आहे. महाविकास आघाडीत अंतर्विरोध, अंतरपाठ नाही. आम्ही वरमाला घातल्या आहेत असे आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

Snehal Joshi
  • Jul 8 2020 10:48AM
सत्ताधारी मित्रपक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सारं काही आलबेल नअसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेतील असंतुष्ट पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची बेचैनी वाढली आहे. महाविकास आघाडीत अंतर्विरोध, अंतरपाठ नाही. आम्ही वरमाला घातल्या आहेत असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले. पारनेर मध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक पडले असा होत नाही. त्यामुळे हा विषय आता चर्चेत येऊ नये असे मला वाटते. असे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राऊत म्हणाले. प्रत्यक्षात याच राऊतांनी मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार जेव्हा स्वतः भाजपात दाखल झाले तेव्हा, भाजपवर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचे चांगलेच तोंडसुख घेतले होते. आपल्या मुखपत्रातून रका नेच्या रकाने भरले होते मात्र खुर्ची आणि सत्तेची लालसा आता लोटांगण घालायला भाग पाडत असल्याची अपरिहार्यता या विधानातून दिसते. मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलीसा तील बदल्यांचे कुणी राजकारण करू नये. त्यावरून काही वाद नाही. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनले आहे. ही खिचडी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण काम करेल. अशा पद्धतीचे खुलासे देण्याची नामुष्की यांच्यावर आता ओढवली आहे. पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राकाँत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आणि शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवला. अहमदनगर मधील शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांनी या प्रकरणी राकॉंने आमच्या पाठीत खंजीर खुपसले ची टीका केली होती. पारनेर से रोको आमदार लंके यांनी पुढाकार घेतला. आणि मुदसर सय्यद, नंदकुमार देशमुख किसन गंधा डे वैशाली फोटो आणि नंदा दशमन या पाच नगरसेवकांना राकाँत आणले. शरद पवार यांचे नातू व नगरमधील आमदार रोहित पवार यांना या पक्षबदलाची कल्पना होती. पवारांचे दुसरे नातू व अजित दादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचाही यात सहभाग होता अशी चर्चा रंगते आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार