सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धर्मांतराला विरोध केल्यामुळे माझ्या मुलीची हत्या झाली - निरंजन हिरेमठ

काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या नेहा हिरेमठ हिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला...

Shruti Patil
  • Apr 25 2024 9:58AM

कर्नाटक: नेहा हिरेमठ हत्या प्रकरणातील आरोपी फैयाज खोंडुनाईक हा एकटाच आरोपी नसून त्याला साहाय्य करणार्‍या एकूण ८ जणांविषयी पोलिसांना स्पष्ट माहिती दिली आहे. असे असले, तरी फैयाजची अटक सोडली, तर पोलिसांनी दुसरे काहीही काम केलेले नाही, अशा शब्दांत नेहाचे वडील आणि काँग्रेसचे येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी संताप व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीविषयी पोलिसांनी आमच्याकडून अधिक माहिती घेण्याचे कामही केलेले नाही. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मी केंद्रशासनाकडे विनंती केली आहे. ‘माझा जीव गेला, तरी हरकत नाही. माझ्या मुलीचा जीव घेणार्‍याला शिक्षा होईलच, यासाठी मी वचनबद्ध आहे’, असे ते म्हणाले.

फैयाजला कठोर शिक्षा झाली, तरच नेहाच्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या मुलीने धर्मांतराला विरोध केल्यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे; परंतु माझ्या मुलीला न्याय मिळेल, याची मला निश्‍चिती नाही. पोलीस कुणाच्यातरी हातातील कळसुत्री बाहुली असल्यासारखे वागत आहेत. राज्य शासनाकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सीबीआयकडे चौकशी हस्तांतरित करण्यात आली नाही, तर मलाच कायदा हातात घेऊन माझ्या मुलीला न्याय द्यावा लागेल, असेही हिरेमठ म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार