सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आंध्रप्रदेश तुन नंदुरबारात सुका गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाकडुन सुमारे पावणेचार लाखाचा गांजा जप्त करण्यात आला

नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्यासाठी आलेले

Nandurbar. MH
  • Dec 26 2020 11:43AM
नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्यासाठी आलेले दोघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांचाकडून पावणे चार लाखाचा गांजा, दोन मोटारसायकली जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई आज सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मागदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे आपले पथक पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे, रविद्र पवार, अतुल बिऱ्हाडे, संदीप गोसावी, भटू धनगर, हेमंत बारी, अनिल बड़े, कल्पेश रामटेके, इम्रान खाटीक, विजय नागोडे, मुद्देमाल कारकून अशोक बहिरम यांच्या पथकाने रेल्वे कॉलनी परिसरात सायंकाळी पाचला सापळा रचून दोघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले.त्यांचाकडून ५ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ३ लाख ७५ हजाराचा सुका गांजा व वाहने, वजनकाटासह अटक करण्यात आले. शहानवाज खान जाफर खान पठाण (वय ४८, खादरनगर, आंध्रप्रदेश) व दुसरा सुदाम रमेश टिळंगे (वय ५४, रा. कंजरवाडा, नंदुरबार) असे दोघांची नावे आहेत. त्यांचे विरुध्द नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार