सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोंदिया- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीपासूनच चर्चेत राहिला आहे. आरोग्य सेवा असो की इतर कारण महाविद्यालय

आरोग्य सेवा असो की इतर कारण महाविद्यालय

Snehal Joshi. MH
  • Mar 23 2021 6:51AM
गोंदिया- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीपासूनच चर्चेत राहिला आहे. आरोग्य सेवा असो की इतर कारण महाविद्यालय प्रशासन आपल्या कारभाराने चर्चेच्या केंद्रस्थानी राहत आले आहे. त्यात आता आणखी भर पडली असून महाविद्यालय प्रशासनाने ५५ लाख रूपयाची विद्युत थकबाकी असल्याचे समोर आले आहे. यामुळे महावितरणने विज भरणा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. थकीत रकमेचा भरणा करण्यात आला नाही तर विज पुरवठा खंडीत होणार, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील जनप्रतिनिधींच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिले आहे. अशात नागरिकांना उत्तम व दजेर्दार आरोग्य सेवा मिळणार, अशी अपेक्षा होती. परंतु, आरोग्य सेवा सोडा विविध कारणांने मेडीकल कॉलेज चर्चेत राहिला आहे. आता त्यात भर पडली असून विद्युत व्यवस्थेला घेवून मेडीकल कॉलेज प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध क्षेत्रात १५ ते १६ विद्युत कनेक्शन घेतले आहेत. परंतु, मागील सहा ते सात महिन्यांपासून विज देयकाचा भरणा मेडीकल प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही.
त्यामुळे महावितरणचे ५५ लाखाचा विज बिल थकबाकी मेडीकल कॉलेजवर आहे. अशात महावितरणकडून थकीत विज बिलाची वसुली केली जात आहे. या अनुसंगाने मेडीकल कॉलेजवर असलेल्या विज थकबाकीची वसुली होणे बाकी आहे. या संदर्भात महावितरणकडून मेडीकल प्रशासनाला नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे विज बिलाचा भरणा करणे गरजेचे आहे. अन्यथा महावितरणच्या कारवाईला मेडीकल प्रशासन समोर जाण्याची दाट शक्यता आहे. कारवाई पोटी मेडीकल कॉलेजचा विद्युत पुरवठाही खंडीत केला जावू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी महावितरण कर्मचारी मेडीकल कॉलेजच्या वसतीगृहात विज पुरवठा खंडीत करण्यासाठी पोहोचले होते. यावर मेडीकलचे अधिष्ठाता यांनी ७ लाख रूपयाचे विज बिल भरणा केल्यामुळे कारवाई टळली. त्यातच शासनाकडून अद्यापही मेडीकल कॉलेजचा ग्रांट मिळालेला नाही. त्यामुळे विज बिलाचा भरणा करण्यात आला नसल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. एकीकडे कोरोनाच्या पाश्र्‍वभुमीवर आरोग्य सेवेला प्राथमिकता दिली जात आहे. परंतु, सहा महिन्यांपासून विद्युत बिल भरणा करण्यात आला नसल्याने मेडीकल कॉलेजच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार