सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सोन साखळी चोरास घेतले ताब्यात

सोन साखळी चोरास घेतले ताब्यात

Sudarshan MH
  • Nov 27 2020 6:46PM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : चिखली येथिल रहीवासी विवेक दत्तात्रय महाजन यांच्या फिर्यादीवरुन चिखली पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात सोनसाखळी चोराविरुध्द कलम 392,34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने चोरुन नेण्यात आली होती. दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्थागुशाखेचे पोलिस निरिक्षक अरविंद गिते यांना सदर गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार ही कारवाई करण्यात येवून हा गुन्हा उघडकीस आणण्यात येवून आज दि.27 नोव्हेंबर रोजी सोनसाखली चोरास ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकास तांत्रिक व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा औलास हुसेन जावेद जाफरी उर्फ रोशन रा.ईराणी गल्ली, शिवाजी नगर, परळी वैजिनाथ जि.बिड याने केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीचे वास्तव्य हे ईराणी गल्ली शिवाजी नगर परळी वैजिनाथ येथे आहे, अशा माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथक परळी वैजिनाथ येथे मागील दोन ते तीन दिवसापासून आरोपी करीता सापळा लावून बसले होते. नमुद पथकाने गुन्ह्यात निष्पन्न असलेला आरोपी औलाद हुसेन जाफरी उर्फ रोशन यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 18 ग्रॅम सोन्याची साखळी किंमत अंदाजे एक लाख रुपये आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी याचेकडून जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर सोनसाखळी चोरीचे / जबरी चोरीचे आणखी गुन्हे उडघडकीस येण्याची शक्यता आहे.
नमुद कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक  अरविंद चावरिया,  खामगांव  अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह  राजपूत, बुलडाणा अप्पर पोलिस  अधिक्षक बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बळीराम गिते, यांचे आदेशान्वये निलेश शेळके, पो.नि. श्रीकांत जिंदमवार, पो.अ.पंकजकुमार मेहेर, भारत जंगले, विजय वारुळे, विजय सोनोने, नदीम शेख यांनी केली.
गुन्ह्याचा पुढील  तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आर.एस.बरकते व  चिखली पो.स्टे.चे ठाणेदार गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब, पोलिस अंमलदार प्रमोद साळवे, भरत पोफळे हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार