सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरणाच्या प्रादुर्भावामुळे हिवरा आश्रम येथील विवेकानंद जयंती उत्सवात शुकशुकाट .

विवेकानंद जयंती उत्सवात शुकशुकाट .

Sudarshan MH
  • Feb 5 2021 7:06AM

(योगेश शर्मा)
 
बुलढाणा : महाराष्ट्रच नव्हे तर देशभर प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे दरवर्षी साजरा होणारे स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाला कोरणाचा ग्रहण लागला आहे. स्वामी शुकदास माउलींनी स्थापन केलेल्या या आश्रमात कदाचित भारतातील सर्वात मोठा स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्सव साजरा होत असतो.
 
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा या गावाला स्वामी शुकदास माउलींनी स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रम मूळे या गावाचे नाव आज हिवरा आश्रम म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहचलेले आहे. याच आश्रमात युवकांचे प्रेरणास्रोत असलेले स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरी होत असते, ज्यामध्ये मुख्य आकर्षण हे येथील महापंगतचा असतो, ज्यामध्ये एकाचवेळी जवळपास दीड ते दोन लाख भाविक एकाच पंगतीत महाप्रसादाचा लाभ घेत असतात, कदाचित हा एक विक्रमच म्हणावं लागेल.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशभरारून लाखोंच्या संख्येने स्वामी शुकदास माऊलींचे भक्तगण येथे हजेरी लावतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावमूळे यावेळेस साजरा होणारा विवेकानंद जन्मोत्सवाला जणू ग्रहण लागले आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची नाराजगी समोर दिसून आली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि जल्लोषात साजरा होणार असे भाविकांना वाटले होते. परंतु भाविकांच्या इच्छेवर पाणी फिरले आणि येथील यात्रा न भरता शुकशुकाट होता.
यावेळेस आश्रम परिसरात शासनाने लाऊन दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याचं प्रयत्न करतांना दिसून आलं. आश्रमाच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या हातावर सेनेटाईजरचा शिडकाव सुद्धा करण्यात येत होतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार