सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली : दीपक केसरकर

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सविस्तर माहिती

Abhimanyu
  • Aug 5 2022 8:22PM
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट रोजी) त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून सातत्याने दौ-यावर असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसून त्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे स्पष्ट केले आहे.
आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात वाटणा-या चिंतेबद्दलही मी त्यांना कळवले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात काय अपडेट्स आहेत?’ असे पत्रकारांनी केसरकरांना गुरुवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारले. यावर उत्तर देताना केसरकर यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दिली. ‘‘मी जेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरू होती. ते आजारी नाहीत 
मात्र त्यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली आहे,’’ असे केसरकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना थकव्यामुळे विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती समोर आली असून केसरकरांनी या थकव्यामागील कारण हे अपुरी झोप असल्याचे सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार