सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खामगाव मध्ये पकडला लाखोचा गुटखा ; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

बुलढाणा : इंदोर वरून अकोल्याला जाणारा लाखो रुपयांच्या अवैध गुटखा साठा खामगाव पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पकडला.

Sudarshan MH
  • May 29 2021 10:06AM

इंदोर वरून अकोला जाणार होता गुटखा
25 लाखांचा मुद्देमाल जप्त


बुलढाणा : इंदोर वरून अकोल्याला जाणारा लाखो रुपयांच्या अवैध गुटखा साठा खामगाव पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पकडला. आयशर ट्रकमधील इतर सामान खाली करण्यासाठी ट्रक खामगावात काही काळ थांबला असता खबऱ्याने याची माहिती पोलिसांना दिल्यावरून हि कारवाई करण्यात आली. या कारवाईत १७ लाख रुपयांचा अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू आणि मुद्देमाल असा २५ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं.
खामगाव येथील आठवडी बाजार भागात असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मध्ये शुक्रवारी सायंकाळी चारचाकी वाहनाने गुटखा येणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीपी पथकाला मिळाली होती. या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक आठवडी बाजारा मध्ये असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मधे गेले असता त्या ठिकाणी एम एच-१९ झेड-४२७९ नंबरच्या आयशर मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला गुटखा सदर गाडीमध्ये मिळून आला. यामध्ये राज निवास गुटख्याच्या पोतडया व आयशर चारचाकी वाहन असे २५  लाख रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार