सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा चे वर्चस्व 129 पैकी 73 ग्राम पंचायतीवर भाजपाचा झेंडा.....अरविंद गजभिये

कामठी विधानसभा क्षेत्रात- 19 पैकी 12 ग्राम पंचायतीत स्पष्ट बहुतम तर 1 ग्रा.प.अपक्षांच्या मदतीने सत्तेत पोहचणार आहे.

Snehal Joshi .
  • Jan 18 2021 4:44PM
दि.15 जानेवारी 2021 रोजी संपन्न झालेल्या 129 ग्राम पंचायत निवडणुकी पैकी 65 ग्राम पंचायतींवर स्पष्ट बहुमत मिळवले असुन 8 ग्राम पंचायतींवर अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवण्यात यश संपादन करणार आहे.जिल्हयातील एकुण 73 ग्राम पंचायती वर भाजपाने आपले वर्चस्व सिदध केले असुन एकुण 1196 सदस्यांच्या निवडणुकीत 652 ग्राम पंचायत सदस्य भाजपाचे निवडुन आले आहेत. महा विकास आघाडीला ग्राम पंचायत निवडणुकीत जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. विधानसभा क्षेत्रात निहाय एकुण ग्राम पंचायत निवडणुकांमध्येमिळालेले यश पुढील प्रमाणे काटोल विधानसभा क्षेत्रात- एकुण 22 ग्राम पंचायत पैकी 9 ग्राम पंचायतीत स्पष्ट बहुमत तर 2 ग्राम पंचायतींमध्ये अपक्षांच्या मदतीने सत्तेत पोहचणार आहे., कामठी विधानसभा क्षेत्रात- 19 पैकी 12 ग्राम पंचायतीत स्पष्ट बहुतम तर 1 ग्रा.प.अपक्षांच्या मदतीने सत्तेत पोहचणार आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रात-20 पैकी 6 ग्राम पंचायत स्प्ष्ट बहुमत तर 3 ग्राम पंचायतींमध्ये अपक्षांच्या मदतीने सत्तेत पोहचणार आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रात 41 पैकी 32 ग्राम पंचायतीत स्पष्ट बहुमत तर 2 ग्रा.प.अपक्षांच्या मदतीने सत्तेत पोहचणार आहे. सावनेर विधानसभा क्षेत्रात 17 पैकी एकही ग्राम पंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरीही सरपंच पदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी चमत्कार होईल अशी अपेक्षा आहे.हिंगणा विधानसभा क्षेत्रात 10 पैकी 3 ग्राम पंचायती स्पष्ट बहुमत तर 3 ग्राम पंचायती अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश मिळेल असा विश्वास जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी व्यक्त केला आहे. केन्द्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी साहेबांनी जिल्हयात निर्माण केलेले रस्त्यांचे जाळे,माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांनी केलेले विकास काम यावर जिल्हयातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.माजी पालकमंत्री मा.चंद्रशेखरजी बावणकुळे साहेब यांनी केलेला जिल्हयाचा दौरा,स्थानीय भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत,यामुळेच जिल्हयात भाजपाला यश प्राप्त झाले असुन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विकास योजनांना दिलेली स्थगीती मुळे स्थानीय मतदारांनी निवडणुकीच्या निमीत्ताने मोठया प्रमाणात नाराजी व्यक्त केली असुन त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार