सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालकमंत्र्याच्या हस्ते धडगाव परीसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

नंदुरबार: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी .पाडवी याच्या हस्ते

Nandurbar. MH
  • Jan 25 2021 9:55AM
सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी
नंदुरबार: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी .पाडवी याच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत धडगाव परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
 
यावेळी जि. प.चे समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.सदस्य जान्या पाडवी, उपअभियंता एम.एस.नाईक, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.
 
पालकमंत्री यांच्या हस्ते खांडबारा ते हालीगव्हाणपाडा या 3 कोटी 14 लाख खर्चाच्या, शिरसाणी ते बुचक्यापाडा 3.5 किलोमीटर कामासाठी 3 कोटी 79 लाख, खरवड ते सरपंचपाडा 870 मीटर रस्त्यासाठी 1 कोटी तर काकरपाटी ते पाटीलपाडा या 1.92 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 79 लाख रुपये खर्च असलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 
 
पालकमंत्री पाडवी यांनी शिरसाणी येथील नागरीकांशी संवाद साधला. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत धडगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यात येईल. दुर्गम भागातील पाडे रस्त्याद्वारे जोडल्याने नागरीकांना त्याचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
पालकमंत्र्याच्या हस्ते सोलरपंपचे उद्घाटन
 
जिल्हा परिषद 20 टक्के सेस फंडाअंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे तेरसिंग पावरा यांना देण्यात आलेल्या सोलरपंपचे उद्घाटन पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते झाले. भुगर्भातील पाणी पातळी लक्षात घेवून सोलरपंपचे वितरण करण्यात यावे अशी सूचना त्यानी यावेळी केली.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार