सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

'राष्ट्र सर्व परी' राष्ट्रवादाचा झेंडा म्हणजेच सुदर्शन न्युज, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा- नितीन गडकरी

शुभेच्छांच्या गुलदस्त्यात मागील 15 वर्षात सुरेशजींने घेतलेले परिश्रम व देशातील त्यांनी अनुभवलेली विपरीत परिस्थिती, राष्ट्रवादी विचारांचे मजबुतीकरण करण्याकरिता समर्पित भावनेने सुरू केलेले सुदर्शन चॅनल आहे. मी आपला संघर्ष व आपल्या चॅनल चा प्रवास जवळून पाहिला आहे.

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 9:05PM
9 ऑगस्ट आज सुदर्शन न्युज चॅनलचा 15 वा वर्धापन दिन म्हणून केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी सुदर्शन न्युज चॅनलचे प्रमुख संपादक सुरेशजी चव्हाणके यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छांच्या गुलदस्त्यात मागील 15 वर्षात सुरेशजींने घेतलेले परिश्रम व देशातील त्यांनी अनुभवलेली विपरीत परिस्थिती, राष्ट्रवादी विचारांचे मजबुतीकरण करण्याकरिता समर्पित भावनेने सुरू केलेले सुदर्शन चॅनल आहे. मी आपला संघर्ष व आपल्या चॅनल चा प्रवास जवळून पाहिला आहे. असे प्रतिपादन नितीनजी गडकरी यांनी केले. अयोध्येतील राम मंदिर असो किंवा आतंकवाद्यांच्या विरोधातले विचार-मंथन असो प्रत्येक वेळी राष्ट्रवादाचा सक्षम झेंडा घेऊन सुदर्शन चॅनल पुढे राहिले आहे. सुरेशजीं बद्दल बोलताना ते म्हणाले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जुने सहकारी म्हणून आपले आत्मीय व कौटुंबिक संबंध असल्याने आपण हाती घेतलेले राष्ट्र विचारांचे चॅनल रुपी राष्ट्रकार्य असेच निरंतर समोर जावे ही शुभेच्छा. सुदर्शन न्युज चैनल हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे हे चॅनल नेहमीच प्रशंसेस पात्र ठरले आहे. कारण चॅनल ने प्रसारित केलेल्या चर्चा, डिबेट ऐकून चॅनल प्रति अभिमान वाटतो. राष्ट्रवादी विचारांचा झेंडा घेऊन सुरेशजींच्या नेतृत्वात देशाची संस्कृती, इतिहास, वैभवसामर्थ्य प्रदान करणारे ठरत असून, देश सुखी, समृद्ध , संपन्न, सक्षम व्हावे आणि आपण *राष्ट्र सर्व परी* हे ब्रीद धारण करून जे मीडिया जगतात आपले कार्य आहे ते लक्षणीय आहे. एक कार्यकर्ता, विचार परिवारातील सदस्याला उत्तुंग कार्याबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदन करतो असे म्हणून पुढे सुदर्शन न्यूज चॅनलने 100 वर्षे पूर्ण करावे. आणि 5 वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रसारित व्हावे अशा शुभेच्छा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक परिवहन आणि एम एस एम इ मंत्री नितिन गडकरी यांनी सुदर्शन चॅनल चे प्रधान संपादक सुरेशजी चव्हाणके यांना दिल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार