सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजप युवा मोर्चा राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठवणार

विद्यापीठ कायदा दुरुस्ती काळे विधेयक लवकरात लवकर वापस घ्यावे- भाजयुमो नागपुर शहरातुन आज पाठवले 10 हजार पेक्षा जास्त पत्र..!

Snehal Joshi .
  • Jan 9 2022 11:38PM
महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने घाई-घाई मध्ये विद्यापीठ कायदा 2016 मध्ये दुरुस्ती विधयेक चर्चा न करताच पारित करत राज्याच्या शैक्षणिक धोरणाला गालबोट लावले आहे. विद्यापीठांच्या स्वायत्तते वर घाला घालत राज्यपाल आणि कुलगुरू यांचे अधिकार कमी करून नवीन प्र-कुलपती हे पद तयार करून सगळे अधिकार या पदानुसार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत राहणार आहेत. या दुरुस्ती विधेयकामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठ ही राजकीय पक्षांचा अड्डा होणार असून भविष्यात विद्यापीठांत मोठ्या प्रमाणात पैशांचा घोडेबाजार होऊन होतकरू, अभ्यासू व गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान यामुळे होणार आहे. हे विधेयक लवकरात लवकर मागे घेण्यात यावं अन्यथा युवा मोर्चा अजुन तीव्र आंदोलन उभारेल असा ईशारा भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांनी आजच्या आंदोलनात दिला.

आजचे आंदोलन प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात व भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे दिपांशु लिगायत, अमोल तिडके, संपर्कमंत्री मनिष मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडले. शहरातील सहाही मंडळात मंडळ अध्यक्ष यश सातपुते, अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर यांच्या नेतृत्वात झाले.

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घाईने व चर्चेविना पारित करण्यात आलेलं विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मागे घेण्याबाबतच्या आंदोलनाचे नियोजन झाले या नुसार आज भाजयुमो संपूर्ण महाराष्ट्रातून भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे विधेयक लवकरात लवकर मागे घेण्या बाबत आज 10 लाख पत्र पाठवून विनंती करण्यात आली. त्याच अनुषंगाने नागपुर शहरातून आज 10 हजार पेक्षा जास्त पत्र युवा मोर्चा तर्फे राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून सामान्य विद्यार्थी, युवक व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या युवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच ज्यांचा या काळया कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आंदोलनाला समर्थन द्यावे असे ही आवाहन यावेळी युवा मोर्चा तर्फे करण्यात आले.

पश्चिम नागपुरात भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी यांच्या नेतृत्वात शहर युवती प्रमुख डिम्पी बजाज, शहर प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, मंडळ महामंत्री पुष्कर पोशेट्टीवार, सागर घाटोले, ईशान जैन, देव यादव, आशिष तिवारी, संदीपन शुक्ला, गौरव पांडे, सोनू गायकवाड़, आनंद गुप्ता, गौरव पाठक, अक्षय शर्मा, दिपेश यादव, विनित शर्मा, वरुण गजभिए, विक्रांत येवतकर, विश्वजीत गवालबंशी, प्रथम शिवहरे, सोनू डकाहा, विशाल सिंह, अनिकेत ढोले, सागर जाधव उपस्थित होते.

दक्षिण नागपुरात अमर धरमारे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. शहर संपर्क प्रमुख वैभव चौधरी, शहर विद्यार्थी  संयोजक संकेत कुकडे, महामंत्री अमित बाराई आकाश भेदे नितीन शिमले संपर्क महामंत्री रिद्धू चोले संपर्कप्रमुख मोहित  भिवनकर, उदय ढोमणे, अभिजित गावंडे नागपूर शहर युवा मोर्चा दक्षिण नागपूर सहसंयोजक आशिष मोहिते, तेजस भागवतकर वॉर्ड अधक्ष्य स्वरूप कोडमलवार, सुरज दगडे, भूषण बिजागरे, विजय मोघे, प्रणय फुलझेले, पवन मांडवगडे, प्रणित पोचमपल्ललीवार, कुणाल सिंग चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी बंडू बिहारे बंटी  काळबांडे उपस्थित होते.

पुर्व नागपुरात मंडळ अध्यक्ष सन्नी राऊत यांच्या नेतृत्वात आशीष मेहर गोविंदा काटेकर राहुल पराते अक्षय ठवकर छगन चिनिरे, खिलावन सेलोकर, मंगेश धार्मिक, गुड्डू पांडे, पिंटू पटेल उपस्थित होते.

मध्य नागपुरात भाजयुमो शहर महामंत्री दीपाशु लिंगायत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळ अध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात मंडळ महामंत्री रितेश पांडे, विद्यार्थी आघाडी सह-संयोजक गौरव हरडे, तुषार जौंजाळ, पवन महाकाळकर, पवन खंडेलवाल, समीर मांडले, सोनु वर्मा, ओमी वर्मा, सचिन पौनिकर, प्रशांत दुर्गे, राजा खान,गोलु समुद्रे, अमीत पांडे, अक्षुन खापरे, अनमोल पोतारे, रोहीत सहारे, करण बाजीराव, अनिकेश लोखंडे, सागर पांडे, पवन मांढळकर, मुकेश पौनिकार बाला झिलपे, सुशिल खापरे, उमेश गोईकर, आशु गुमगावकर, महेश बांगडे, अक्षय केदार उपस्थित होते.

दक्षिण पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष यश सातपुते यांच्या नेतृत्वात शहर संपर्क प्रमुख शौनक जाहागीरदार,मंडळ महामंत्री करण यादव, राकेश भोयर, शहर प्रसिद्धी सह-प्रमुख मनमित पिल्लारे, चेतन धार्मिक, वेदांत जोशी, शुभंकर डबले, गौरव कटरे, तेजस शास्त्री, ऊकेश आग्रे, जतिन कांबळे, अनमोल उईके, मंदार इंगळे, मयुर भुते उपस्थित होते.

उत्तर नागपुरात पंकज सोनकर यांच्या नेतृत्वात भाजयुमो मंडळ पालक अमित पांडे, शहर संपर्क प्रमुथ जय साजवानी, मंडळ महामंत्री सौरभ पराशर, आशीष मिश्रा, अजिंक्य सहारे, विक्की बगले, विक्की किरपाने, मोहम्मद सलमान, रितेश पांडे, बलराम मनुजा, यशवंत वैद्य, लक्की समूँदरे, प्रणिल किरपाने, गौरव मरकाम, जतिन मेटवानी, आकाश गुप्ता, आनंद कश्यप प्रमुख्याने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार