सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाकीपाडा तपासणी केंद्रावर पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याच्या रागातून हल्ला

नदुरबार - कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल का

Nandurbar. MH
  • Apr 9 2021 8:01PM
नदुरबार - कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल का दिला अशी विचारणा करीत एका संतप्त तरुणाने कोरोना चाचणी शिबिरातील कर्मचाऱ्यावर हल्ला करीत धिंगाणा घातला. यामुळे संतप्त झालेल्या आरोग्य सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. 
अधिक वृत्त असे की नवापुर तालुक्यातील वाकी पाडा गावात दिनांक 12 मार्च पासून कोरोना चाचणी शिबिर सुरू करण्यात आले आहे रोज ग्रामस्थांची त्यावर तपासणी केली जात आहे आज दुपारपर्यंत या वाकी पाडा केंद्रात 55 जणांची तपासणी झाली त्यातून सात जण पॉझिटिव आढळले. पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेल्यांमधे विकेश मावची रा.वाकीपाडा याचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून खात्री करण्यासाठी त्याने गुजरात राज्याच्या हद्दीतील उच्छल केंद्रावर जाऊन तपासणी करून घेतली तेव्हा निगेटिव्ह रिपोर्ट त्याला मिळाला. त्यावरून संतप्त झालेल्या विकेशने वाकीपाडा गावात येऊन तपासणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. आपल्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट का दिला? असा प्रश्न करीत कागदांची आणि वस्तूंची फेकाफेक करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली अशी फिर्याद दशरथ मुसळदे यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. दरम्यान, संतप्त आरोग्य सेवकांनी थेट काम बंद आंदोलन पुकारले. त्या तरुणावर कारवाई व्हावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करीत निषेध नोंदवला आहे. विकेश याला महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये तूर्त ठेवण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार